Happy Birthday Usha Nadkarni | 75 वर्षांचा सळसळता उत्साह! मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातही उषा नाडकर्णींचा दमदार अभिनय!

आज (13 सप्टेंबर) टीव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni )यांचा वाढदिवस आहे. उषा नाडकर्णी यांचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत झाला. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेत्रीने 'सिंहासन' या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

Happy Birthday Usha Nadkarni | 75 वर्षांचा सळसळता उत्साह! मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वातही उषा नाडकर्णींचा दमदार अभिनय!
Usha nadkarni
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 11:39 AM

मुंबई : आज (13 सप्टेंबर) टीव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni )यांचा वाढदिवस आहे. उषा नाडकर्णी यांचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत झाला. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेत्रीने ‘सिंहासन’ या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटांच्या जगात पाऊल ठेवले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. अभिनेत्रीने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही खूप काम केले.

1987मध्ये, उषा नाडकर्णी यांनी ‘सडक छप’ या चित्रपटात एका अंध स्त्रीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना त्यांची भूमिका खूप आवडली होती. त्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळत राहिले.

मालिका विश्व गाजवले!

1999 मध्ये, अभिनेत्रीने चित्रपटांनंतर मालिका विश्वात प्रवेश केला. त्यानंतर घराघरात प्रेक्षक रोज उषा नाडकर्णी यांचे काम पाहू लागले. मराठी मालिका आणि चित्रपट विश्वात अभिनेत्रीने खूप काम केले आहे. चित्रपट असो किंवा मालिका, अभिनेत्रीला आज बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार आणि दिग्दर्शक त्यांना ओळखतात.

उषा नाडकर्णी यांचे काम सर्वांना खूप आवडले आहे. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मालिका असल्याचे सिद्ध झाले. या मालिकेत उषाताई, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यासोबत दिसल्या होत्या. जिथे त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या मालिकेत त्यांनी सविता देशमुख ही भूमिका साकारली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर त्यांनी म्हटले होते की, ‘माझा माणूस (सुशांत सिंह राजपूत) माझ्या हृदयात कायम राहील, त्याला कोणीही माझ्या हृदयातून बाहेर काढू शकत नाही.’

‘मराठी बिग बॉस’मधून केले प्रेक्षकांचे मनोरंजन

आजघडीला ‘बिग बॉस’ हा टीव्हीचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो बनला असताना, उषा नाडकर्णी यांनी ‘मराठी बिग बॉस 1’मध्ये भाग घेतला होता. त्यांनी या घरात खूप दमदार खेळ केला. जिथे प्रेक्षकांनी त्यांचा सहभाग खूप आवडला होता. अभिनय विश्वात अभिनेत्रीने उत्तम कामगिरी केली आहे. उषा नाडकर्णी, संजय दत्तच्या ‘वास्तव’ चित्रपटातही दिसल्या होत्या. खरं तर त्यांनी या चित्रपटात एका आईची भूमिका साकारली होती. जी आजही कोणी विसरू शकलेले नाही. उषा नाडकर्णी यांचा अभिनय आजच्या अभिनेत्रींपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. जो प्रेक्षकांना पाहायला आवडतो.

अभिनयासाठी सुंदर चेहरा किंवा मेकअपची गरज नसल्याचे उषा नाडकर्णी नेहमीच म्हणतात. अभिनयासाठी, आपल्याला फक्त एक पात्र नेमके कसे साकारायचे आहे, हे माहित असणे आवश्यक आहे. आज अभिनेत्री उषा नाडकर्णी वयाच्या 75व्या वर्षीही मनोरंजन विश्वात तितक्याच ताकदीने सक्रिय आहेत.

हेही वाचा :

Video | पॅरानॉर्मल तज्ज्ञ स्टीव्ह हफचा सिद्धार्थ शुक्लाशी संवाद, पाहा काय म्हणाला अभिनेत्याचा आत्मा?

कोणी तरी येणार येणार गं, ‘फत्तेशिकस्त’च्या ‘या’ जोडीनं चाहत्यांना दिली गोड बातमी

Kangana’s Boyfriend: कंगना म्हणते, असला बॉयफ्रेंड हवा गं बाई; पाहा काय आहेत डिमांड

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.