Jeev Zala Bajind : मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीमुळे तुम्हीही म्हणाल ‘जीव झाला बाजिंद’

निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती यावेळी घेऊन आली आहे म्युझिकल भेट, ज्यामुळे आता तिचे चाहते आणि सर्वचजण म्हणणार 'जीव झाला बाजिंद'... (Jeev Zala Bajind: With the new duo of Monalisa Bagal and Vitthal Kale, you too will say 'Jeev Zala Bajind')

Jeev Zala Bajind : मोनालिसा बागल आणि विठ्ठल काळे या नव्या जोडीमुळे तुम्हीही म्हणाल 'जीव झाला बाजिंद'
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 6:24 PM

मुंबई : टेलिव्हिजनवर (Television) आणि अनेक सिनेमांत (Movies) आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडत असलेली आणि अतिशय सुंदर (Amazing Actress) अंदाजात झळकलेली सुंदर, निरागस आणि कमाल अभिनय करणारी अभिनेत्री मोनालिसा बागल (Actress Monalisa Bagal) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती यावेळी घेऊन आली आहे म्युझिकल भेट, ज्यामुळे आता तिचे चाहते आणि सर्वचजण म्हणणार ‘जीव झाला बाजिंद’…

मालिका आणि सिनेमांमध्ये साकारल्या वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका

आतापर्यंत मोनालिसाने मालिका आणि सिनेमांमध्ये वेगवेगळ्या जॉनरच्या भूमिका साकारल्या आहेत, त्यामुळे नेहमीच तिच्या अभिनयातला वेगळेपणा जाणवला आणि तिची मेहनत प्रेक्षकांना दिसली आणि म्हणूनच प्रेक्षक तिच्यावर प्रचंड जीव लावतात. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या गाण्यातून ती प्रेक्षकांसमोर आली आहे. नेहमी पेक्षा वेगळ्या धाटणीचं, गावरान बाज असलेल्या ‘जीव झाला बाजिंद’ या गोड आणि नव्या गाण्यात मोनालिसा बागल दिसणार आहे.

गाण्यात पाहायला मिळणार विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री

गावाकडची प्रेम कथा सांगणाऱ्या या गाण्यात मोनालिसासोबतच अभिनेते विठ्ठल काळे झळकणार आहेत. हे गाणं एक वेगळा अनुभव नक्कीच देऊन जाईल पण या गाण्याच्या निमित्ताने मराठी मनोरंजनसृष्टीत एक नवीन जोडी दिसणार आहे. विठ्ठल काळे आणि मोनालिसा बागल या दोघांची गावातली केमिस्ट्री नक्कीच सर्वांच्या मनात घर करेल असा विश्वास गाण्याचे दिग्दर्शक शुभम गोणेकर यांनी व्यक्त केला आहे. 8 ऑक्टोबरपासून म्हणजेच हे गाणं आता प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाले आहे.

पाहा गाणं

बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलं गाणं

या गाण्याचे शब्द बारामतीच्या निलेश धुमाळ यांनी लिहिलेले असून मयूर सुकाळे यांनी गायले आहे. तर संगीत संकेत शिर्के यांनी दिले आहे आणि या गाण्याचे संगीत संयोजन अवी लोहार यांनी केले आहे.

गावाकडचे वातावरण, कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत मोहून टाकणारा

एकूणच गावाकडचे वातावरण, दोन कलाकारांमधील केमिस्ट्री, गाणं, आवाज-संगीत आणि शब्द या सगळयाने तुम्हा सर्वांचा जीव बाजिंद होणार आहे हे नक्की… नक्की पाहा ‘जीव झाला बाजिंद’ हे गाणं ‘मराठी Originals’ या यूट्यूब चॅनेलवर…

संबंधित बातम्या

Bappi Lahiri Family : बप्पी लाहिरीच्या कुटुंबियांनी केली दुर्गेची आराधना, नातू रेगो बीने वेधलं सर्वांचं लक्ष!

Alanaa Panday : अनन्या पांडेच्या बहिणीसमोर बॉलिवूड सुंदरीसुद्धा फेल, फोटो पाहून व्हाल घायाळ!

Monalisa : मोनालिसाने नवरात्रीमध्ये पारंपारिक अवतारात जिंकली चाहत्यांची मनं, साध्या लूकवर चाहते घायाळ

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...