चित्रपटगृहात ‘झिम्मा’चा खेळ रंगणार, लॉकडाऊननंतर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा मराठी चित्रपट!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' (Jhimma) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होत. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती.

चित्रपटगृहात 'झिम्मा'चा खेळ रंगणार, लॉकडाऊननंतर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा मराठी चित्रपट!
Jhimma
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 1:42 PM

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ (Jhimma) या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होत. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. मात्र महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. परंतु आता प्रेक्षकांसाठी एक खुशखबर असून ‘झिम्मा’ चा खेळ आता लवकरच रंगणार आहे, ‘झिम्मा’ 19 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे.

वेगवेगळया पार्श्वभूमी, व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रिया जेव्हा आपल्या सर्व जबाबदाऱ्या बाजूला ठेवून आपले आयुष्य मनमुराद जगण्यासाठी एकत्र येतात तेव्हा जी धमाल होते, ती या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या जबरदस्त अभिनेत्रींसोबत सिद्धार्थ चांदेकरही दिसणार आहे.

महिलांच्या जबाबदारीचं दर्शन घडवणारा टिझर

इंग्लंडला जाण्यासाठी नवऱ्याची परवानगी मागणारी बाई, तिथे जाताना घरातील सदस्यांना अनेक सूचना देणारी बाई, बॅग पॅक करताना भांडणं करणारी आई-मुलगी, घरच्यांना खोटं सांगून फिरायला निघालेली बाई, मुलीच्या काळजीपोटी इंग्लंडला जाण्यासाठी द्विधा मनस्थितीत असलेली आई, तर एकीकडे आईची परवानगी न मागता मी फिरायला जात असल्याचे ठासून सांगणारी तरुणी अशा सात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या, वेगवेगळ्या विचारांच्या, एकमेकींशी ओळख नसलेल्या या महिलांना त्यांची स्वतःशी आणि इतरांशी एक नवी ओळख करून देणारी ही सफर ठरणार असून ही सफर घडवून आणणार आहे सिद्धार्थ चांदेकर. या सहलीत सिद्धार्थ पास होतो की नापास हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल. मात्र टिझर पाहून तरी ‘झिम्मा’ हा अत्यंत सकारात्मक भाव असलेला आणि धमाल, मस्ती, मजा असणारा आणि मनोरंजनाचे एक फुल्ल ऑन पॅकेज देणारा कौटुंबिक सिनेमा आहे, हे नक्की.

दिग्दर्शक हेमंत ढोमेची प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे सांगतो, “हा सिनेमा बघताना या सात जणींमध्ये कुठेतरी आपणही दडलो आहोत, याची प्रत्येक स्त्रीला नक्कीच जाणीव होईल. सगळी बंधने, जबाबदाऱ्या काही काळासाठी विसरून फक्त स्वतःसाठी स्वछंदी आयुष्य जगणाऱ्या या सात अतरंगी बायकांची धमाकेदार कहाणी प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे. इंद्रधनुष्याच्या सात रंगांप्रमाणे असणाऱ्या या सात स्त्रिया त्यांच्या आयुष्यातील हे रंग अधिक गडद करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ‘झिम्मा’चा टिझर सर्वांसमोर आणण्यासाठी आजच्या दिवसापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही.”

‘चलचित्र कंपनी’ प्रस्तुत ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट’ आणि ‘क्रेझी फ्यू फिल्म्स’ निर्मित ‘झिम्मा’ या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांचे असून अमितराज यांचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. तर छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, अनुपम मिश्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

हेही वाचा :

चंदीगडच्या हरनाझ संधूने कोरलं ‘मिस दिवा मिस युनिवर्स 2021’वर नाव, जाणून घ्या या मॉडेलविषयी…

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’वर पाकिस्तानी कलाकारांची टीका, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.