आई सोंगणी करताना गायची, मुलगा कोरस द्यायचा; किरण सोनावणेंचा गायक म्हणून घडतानाचा रंजक प्रवास

गायक किरण सोनावणे यांची गायक म्हणून झालेली जडणघडण अत्यंत वेगळी आहे. कधी आईच्या मागे शेतात गाणी गायची... कधी जंगलात लाकूडफाटा गोळा करताना गाणी गायची... (kiran sonavane: story of unknown singer who made his career himself)

आई सोंगणी करताना गायची, मुलगा कोरस द्यायचा; किरण सोनावणेंचा गायक म्हणून घडतानाचा रंजक प्रवास
kiran sonavane
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 7:39 AM

मुंबई: गायक किरण सोनावणे यांची गायक म्हणून झालेली जडणघडण अत्यंत वेगळी आहे. कधी आईच्या मागे शेतात गाणी गायची… कधी जंगलात लाकूडफाटा गोळा करताना गाणी गायची… तर कधी गायकांच्या मागे बसून कोरस द्यायचे… अशी त्यांची गायक म्हणून जडणघडण झाली. या रियाजाचा त्यांना पुढे गायक म्हणून उभे राहताना खूप मोठा फायदा झाला. (kiran sonavane: story of unknown singer who made his career himself)

भूईमुगाच्या शेंगा तोडताना रियाज

किरण सोनावणे यांनी 1964 साली गायकीला सुरुवात केली. प्रसिद्ध कवी, गीतकार लक्ष्मण शिंदे ऊर्फ भ्रमर यांचे गायक सदाशिवर रणदिवे यांच्यासाठी सोनावणे सुरुवातीला कोरस करायचे. रणदिवे अंध होते. पण सुरेख गायचे. देवळालीला पटेकर नावाचे गायक होते. ते रोज रात्री अंगणात पेटी, ढोलकी वाजवत रियाज करायचे. तेही संस्कार सोनावणेंवर होतेच. देवळालीला असताना इतरांच्या शेतात सोंगणी करताना, भूईमुगाच्या शेंगा तोडताना किंवा जंगलात लाकूडफाटा तोडताना त्यांचं गाणं गुणगुणनं सुरूच असायचं. आई सोंगणी करताना गाणं गायची. तेव्हा लहानगा किरणही गुणगुणायचा. हाच काय तो त्यांचा रियाज होता. या लहान वयात आळवलेल्या स्वरांचा नंतर गायक म्हणून उभं राहताना त्यांना खूपच फायदा झाला. चाल, राग आणि ठेक्याची त्यांना चांगली समज आली होती.

बाबासाहेबांचं दर्शन घेता आलं नाही

लहानपणीचा एक प्रसंग त्यांच्या मनावर कोरला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं होतं. तेव्हा सोनावणे आठ वर्षाचे होते. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याचं कळताच लोकांचा घोळका जमला आणि एकच आक्रोश सुरू झाला. काय झालं हे सोनावणेंना कळेचना. बाबासाहेब गेल्याचं कळलं नाही. समजून घेण्याचं ते वयही नव्हतं. त्यावेळी मला थोडं आकलन असतं तर बाबासाहेबांचं शेवटचं दर्शन घेता आलं असतं, अशी चुटपूट सोनावणे व्यक्त करतात.

त्रिकूट जमलं अन्…

1960-67च्या काळात मुलुंडमध्ये राहत असताना त्यांचा लक्ष्मण शिंदे यांच्या नवरंग गायन पार्टीशी संबंध आला. नवरंग गायन पार्टीचा त्याकाळी मोठा बोलबाला होता. नवरंगच्या प्रत्येक कार्यक्रमात सोनावणे कोरस करायचे. सोनावणेंच्याच चाळीत कवी लक्ष्मण शिंदे यांचे धाकटे बंधू श्रीधर ऊर्फ साजन शिंदे राहायचे. ते सुद्धा गाणी लिहायचे. चिंतामण गांगुर्डे हेही कवी होते. त्यामुळे हे तिघे एकत्रं आले. साजन, चिंतामण आणि किरण या त्रिकुटाची गट्टी जमली. त्यानंतर त्यांनी एकमेकांच्या गाण्यांना उत्तरं देण्यास सुरुवात केली. त्याच काळात त्यांनी छोटे छोटे कार्यक्रमही केले. पुढे कवी, गायक आणि शाहीर विलास घोगरे मुलुंडमध्ये राहायला आले. सोनावणेंचे एखादे गाणे आवडले की विलास घोगरे ते गाणं घ्यायचे आणि तन्मयतेने गायचे. कवी बाळहरी झेंडे यांचीही गायन पार्टी होती. त्यांचे गायक होते टी. एस. लोंढे. त्यांचे भरपूर कार्यक्रम व्हायचे. त्याच काळात सोनावणेंनीही नवदीप गायन पार्टीची स्थापना केली. वामनदादा कर्डक यांना गुरु मानून ते गावोगावी कार्यक्रम करायचे.

जा रे जा रे जा माहेरी पाखरा, सांग आईच्या कानी हळू जरा, एकदा भेट घेऊन या लेकरा…

हृदयनाथांचे मार्गदर्शन

या गाण्याने सोनावणे यांना खरी प्रसिद्धी मिळवून दिली. पण हे गाणं कॅसेटमध्ये आलेलं नाही. परंतु, तरीही ते आजही अनेकांना आठवतं. आपलं गाणं अधिक चांगलं व्हावं म्हणून त्यांनी वाचनावर अधिक भर दिला. शिवाय साजन, चिंतामण आणि किरण हे तिघेही एकमेकांच्या कवितेतील चुका एकमेकांना सांगू लागले. त्यातून कवितेतील बारकावे अधिक समजू लागले. त्याच काळात प्रसिद्ध कवी हृदयनाथ सिन्नरकर यांच्या चाळीत राहायला आले. त्यामुळे त्यांच्याशीही मैत्री जमली आणि त्यांचे मार्गदर्शनही मिळू लागले. (साभार: ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (kiran sonavane: story of unknown singer who made his career himself)

संबंधित बातम्या:

थिएटरमध्ये गाण्याची पुस्तके, खाद्यपदार्थ विकले, डोअर किपरचा गायक कसा झाला?, वाचा किरण सोनावणेंचा प्रवास!

लिहिता-वाचता येत नव्हतं, पण जिद्दीने शिकले, काचवादक ते शाहीर म्हणून उदय; वाचा एका शाहिराची कथा

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

(kiran sonavane: story of unknown singer who made his career himself)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.