AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

आंबेडकरी गीतं, कव्वाली, भक्तीगीतं आणि लोकगीतं गाणाऱ्या लोकप्रिय गायिका निशा भगत यांनी पार्श्वगायनाबरोबरच सिनेमात कामही केलं आहे. (know everything about singer nisha bhagat)

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?
nisha bhagat
| Updated on: Apr 25, 2021 | 4:28 PM
Share

मुंबई: आंबेडकरी गीतं, कव्वाली, भक्तीगीतं आणि लोकगीतं गाणाऱ्या लोकप्रिय गायिका निशा भगत यांनी पार्श्वगायनाबरोबरच सिनेमात कामही केलं आहे. गाण्यासाठी त्या अवघ्या दोन महिन्यात उर्दू आणि अरबीही शिकल्या. त्यांनी हजारो गाणी गायली. अनेक मानसन्मानही मिळाले. मात्र, त्यांनी आपलं क्षेत्रं फक्त गाण्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही. गाण्याशिवाय त्या सामाजिक चळवळीतही कार्यरत आहेत. निशाताईंच्या या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (know everything about singer nisha bhagat)

दोन महिन्यातच उर्दू शिकल्या

निशाताईंचं मराठी आणि हिंदी प्रमाणेच उर्दू आणि अरबी भाषेवरही प्रभूत्व आहे. उल्हासनगर येथे राहणारे अचलपूरचे शिक्षक आणि शायर खालीश तस्कीमी यांनी त्यांना उर्दू आणि अरबीचे शिक्षण दिले. अवघ्या दोन महिन्यातच त्यांनी उर्दू भाषेवर प्रभुत्त्व मिळवलं होतं. निशाताईंचं शालेय शिक्षण तसं अधिक झालं नाही. परंतु, शिक्षण घेत असताना साहेबराव सुरवाडे, अप्पा इंदिसे, नाना इंदिसे, श्री. पोरके आणि कवी राजगुरु यांनी त्यांना भरपूर मदत केल्याचं त्या आवर्जुन सांगतात.

पतीमुळे सिनेमात संधी

भीमगीते, लोकगीतांबरोबरच त्यांनी कव्वालीही गायली आहे. पती शंकर कांबळे यांच्यामुळे त्यांना सिनेमात पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली. त्यांचे पती शंकर कांबळे हे सिनेक्षेत्रात असल्याने त्यांना ही संधी मिळाली. ‘लक्ष्मी वसंत’, ‘थांब लक्ष्मी थांब’ या मराठी आणि ‘सैय्या भईल कोतवाल’, ‘डाकू बसंती’, ‘मुन्नीबाई’ या भोजपुरी आणि हिंदी सिनेमात त्यांनी पार्श्वगायन केलं.

‘बाळ भीमराव’ सिनेमात काम

‘बाळ भीमराव’ या सिनेमात अभिनय आणि पार्श्वगायनही त्यांनी केलं आहे. ‘मंत्रालय वार्ता’चे संपादक आणि सिनेनिर्माते अनिल अहिरे आणि निशाताई यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रकाश नारायण जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

या कॅसेट गाजल्या

‘बुद्ध पहाट’, ‘जयभीमची मालगाडी’, ‘तिर्थरुप बाबासाहेब’ आणि ‘हॅलो, मी बाबुराव बोलतोय’ या त्यांच्या कॅसेट गाजल्या. तर ‘टपलाय बोका’ या कॅसेटमध्ये त्यांनी सुदेश भोसलेंबरोबर पार्श्वगायन केलं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर खानदेशी भाषेत अनेक गाणी लिहिली गेली होती. पण बाबासाहेबांवरील खानदेशी गीतांची कॅसेट मात्र कुणीही काढली नव्हती. निशाताईंनी सर्वप्रथम या भाषेत बाबासाहेबांवरील गीतांची कॅसेट काढली. त्यांनी हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या शेकडो कॅसेट बाजारात आहेत. मात्र, आनंद शिंदे आणि प्रकाश पाटणकर यांच्यासोबत गाणं गायला त्यांना अधिक आवडतं. त्या हार्मोनियम आणि तबलाही उत्तम वाजवतात. शिवाय फावल्या वेळेत त्या वाचनही करतात.

सामाजिक कार्यातही आघाडीवर

निशाताई केवळ गाण्यातूनच प्रबोधन करत नाहीत, तर त्या सामाजिक कार्यातही तितक्याच सक्रिय असतात. उल्हासनगर, भीम कॉलनी, ओटी सेक्शन-4 मधल्या संघमित्रा बहुउद्देशीय महिला मंडळाच्या त्या अध्यक्षा आहेत. या मंडळाच्या माध्यमातून महिलांच्या समस्या आणि कौटुंबीक समस्या सोडवण्याचं त्या काम करतात. कानपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. त्याचे देशभर पडसाद उमटले होते. त्यावेळी निशाताईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटनेने उल्हासनगरात रास्तारोको आंदोलन केलं होतं. पुतळा विटंबनेप्रकरणी उल्हानगर पोलिसांनी निरपराध तरुणांना पकडले होते. या तरुणांना सोडवण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांच्या मदतीने प्रयत्न केले होते.

निशाताईंची गाजलेली गाणी

आई रमाई माझी लाखात एक होती, गुणाने नेक होती, करणीने चोख होती…

आणि

धाडीते पतूर आज धनी मी तुम्हाला चौदा एप्रिल आली, आज जयंती सणाला…

आणि

दलितों के दिल का करार मिला है, मुझे प्यारे भीमजीका प्यार मिला है….

आणि

बाई माझं… बाई माझं… नशीब आहे थोरं, मिटला जीवाचा घोरं, असं लेणं न्याले मी, उपासिका झाले मी, उपासिका झाले मी…

आणि

आनंदले मन माझे, त्या लुंबिनी वनी गं, दिसे जिथे वैशाखी पौर्णिमा देखणी गं…

आणि

उमर में बाली भोली भाली, शिल की झोली हूँ, अरे, भीमराज की बेटी मै तो, जयभीमवाली हूँ… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know everything about singer nisha bhagat)

संबंधित बातम्या:

गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा

दिवसा शाळा, रात्री गायनपार्ट्या, लतादीदींनीही कौतुक केलेली ही गायिका माहीत आहे का?

‘बाबासाहेब जिंदाबाद’साठी पत्नीने अंगावरचे दागिने मोडले; वाचा, शाहीर कुंदन कांबळेंचा किस्सा

(know everything about singer nisha bhagat)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.