गायक साजन शिंदेंची कमाल; जिथे कोरस दिला, तोच स्टेज गायक म्हणून गाजवला!
गायकाच्या मागे बसून ज्या स्टेजवर कोरस दिला. त्याच स्टेजवर नंतर मुख्य गायक म्हणून कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, असं फार क्वचित घडतं.
मुंबई: गायकाच्या मागे बसून ज्या स्टेजवर कोरस दिला. त्याच स्टेजवर नंतर मुख्य गायक म्हणून कार्यक्रम करण्याची संधी मिळाली, असं फार क्वचित घडतं. साजन शिंदे याबाबतीत भाग्यवान ठरले. गायक म्हणून जडणघडण होत असताना साजन यांनी अनेक बड्या गायकांच्यामागे बसून कोरस केलं. अनेक कार्यक्रम केले. पण कोरस म्हणून. मात्र, जेव्हा ते गायक म्हणून नावारुपाला आले तेव्हा त्यांनी कोरस म्हणून कार्यक्रम केलेले स्टेजही गाजवले. कसा आहे साजन शिंदे यांचा प्रवास? यावर टाकलेला हा प्रकाश. (know facts about the dalit Singer sajan shinde)
अन् मुंबई गाठली
श्रीधर भागवत शिंदे हे साजन शिंदे यांचं खरं नाव. पण मराठी, हिंदी आणि ऊर्दू गीते लिहिताना त्यांनी श्रीधर ऐवजी ‘साजन’ हे टोपन नाव घेतलं आणि पुढे याच नावाने त्यांची ओळखही निर्माण झाली. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मोह गावी 23 एप्रिल 1945 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भागवत बंडुजी शिंदे तर आई जाईबाई शिंदे. भागवत शिंदे यांना चार मुले होती. नारायण, लक्ष्मण, श्रीधर आणि राजकुमार. श्रीधर अर्थात साजन हे तीन नंबरचे. तर थोरले बंधू लक्ष्मण शिंदे हे कवी भ्रमर या नावाने प्रसिद्ध आहेत. साजन यांचे शिक्षण इयत्ता नववीपर्यंत झाले. वडील गवंडी काम करायचे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. त्यामुळे साजन यांचं पुढील शिक्षण होऊ शकलं नाही. गरिबीमुळे शिंदे कुटुंबीय 1948मध्ये मुंबईत आलं. मुलुंडच्या इस्लामपुरा चाळीत हे कुटुंब राहू लागलं. 1960 पर्यंत मुलुंड हे गाव होतं. तालुका साष्ठी आणि जिल्हा ठाणे होता.
आई, भाऊ, भावजयचे कष्ट
1956 मध्ये साजन यांच्या वडिलांचं पोटाच्या विकाराने निधन झालं. तेव्हा साजन यांचं वय होतं अकरा वर्षे. त्यांचे थोरले बंधू नारायण हे ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यामुळे वडिलांच्या निधनानंतर नारायण यांच्यावर सर्व घराचा भार आला. परिवार मोठा असल्याने साहजिकच नारायण यांच्या एकट्याच्या पगारात भागत नव्हतं. त्यामुळे नारायण यांच्या पत्नी बायजाबाई गवंडी काम करू लागल्या. तर त्यांची आई जाईबाई या बागेत फुले तोडाचं काम करायच्या. त्यातून घराचा खर्च कसाबसा रेटला जात होता.
अखेर सूर सापडला
मेहुणे बजू भागाजी रोकडे यांनी साजन यांना 1961मध्ये मॉडेल वुलन मिल्समध्ये कामाला लावले. त्यानंतर पाच सहा महिन्यात बंधू लक्ष्मण यांनी साजन यांना सिन्थ फेब्रिक्स खात्यात कामाला लावले. ज्येष्ठ बंधू नारायण हे ठाण्याच्या भारत नाट्य मंडळाचे सभासद होते. त्यामुळे ते नाटकातून काम करत होते. त्यांनी भूमिका केलेली कोकणचा तात्या, फूट पायरी ही नाटके त्याकाळी गाजली होती. त्यामुळे घरात थोडसं संगीत, कलेचं वातावरण होतंय. त्याकाळात मुलुंडमध्ये आंबेडकर जयंती मोठ्या प्रमाणावर होत असे. त्यामुळे जयंतीचे कार्यक्रमही खूप होत असत. त्यातूनच साजन यांची जडणघडण झाली. घरात गाण्याचा कोणताही वारसा नसताना केवळ गायनपार्ट्यांमध्ये जाऊन कोरस देत देत साजन यांनी स्वत:ला गीतकार आणि गायक म्हणून घडवलं. 1962पासून त्यांनी खऱ्या अर्थाने शब्दांना वाट मोकळी करून दिली.
सागर सरिता संगम आपला, दो हृदयाचा विहंगम आपला, जीव भोळा हा माला जपला गं, तू तिथं मी तिथं….
‘हसता हुआ नुरानी चेहरा…’ या सिनेमातील गीताच्या चालीवर त्यांनी हे पहिलं गाणं लिहिलं होतं. पुण्यातील गायक सदाशिव रणदिवे यांनी हे गीत गायलं होतं. 1968मध्ये त्यांनी मुंब्रा स्टेशनजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने गायनाचा पहिला जाहीर कार्यक्रम केला. त्यानंतर भीड चेपली आणि साजन यांचे दणक्यात कार्यक्रम सुरू झाले. विशेष म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कोरस म्हणून कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या ठिकाणीही त्यांनी त्यांचे स्वतंत्र गाण्याचे कार्यक्रम केले. (साभार, आंबेडकरी कलावंत) (know facts about the dalit Singer sajan shinde)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 10 August 2021 https://t.co/GrqdElhivo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 10, 2021
संबंधित बातम्या:
गुरूशीच सामना रंगला, गझलेच्या प्रांतातही मुशाफिरी; गौतम संकपाळ यांचा हा सफरनामा वाचाच!
15 वर्षाची मेहनत कचऱ्यात, गाणं लिहिताना ढसढसा रडले; गीतकार अम्बादेंच्या बाबतीत नेमकं काय घडलं?
(know facts about the dalit Singer sajan shinde)