Kranti Redkar: 6 वर्षांनंतर क्रांती रेडकरचं दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन; ‘रेनबो’च्या शूटिंगचा लंडनमध्ये श्रीगणेशा

'रेनबो' म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे.

Kranti Redkar: 6 वर्षांनंतर क्रांती रेडकरचं दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन; 'रेनबो'च्या शूटिंगचा लंडनमध्ये श्रीगणेशा
'रेनबो'च्या शूटिंगचा लंडनमध्ये श्रीगणेशाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:24 AM

काही महिन्यांपूर्वी ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘हाय आयक्यू’ यांच्या सहयोगाने ‘मँगोरेंज प्रॉडक्शन’ निर्मित ‘रेनबो’ (Rainbow) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून लवकरच हा चित्रपट रंगांची उधळण घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात शरद केळकर (Sharad Kelkar), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni), उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहते. ‘रेनबो’ म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या चित्रपटात देखील आपल्याला विविध रंग पाहायला मिळणार आहेत. आजच्या काळात नात्यांमध्ये येणाऱ्या विविध रंगांचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांचा मिळून हा ‘रेनबो’ तयार होत असल्याने हे सर्व रंग एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.

दिग्दर्शिका क्रांती रेडकर म्हणते, “रेनबो हे नावच कलरफुल आहे. या नावातच सारे रंग भरलेले आहेत. नात्यातील हाच सप्तरंगी प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ चा भाग होण्याची संधी मला मिळाली. इतक्या दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली असून आता चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.”

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

या चित्रपटाविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “क्रांती रेडकर ही अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय तिचे दिग्दर्शन देखील कमाल आहे. ‘रेनबो’ हा असा चित्रपट आहे, जो नात्यातील काही संवेदनशील गोष्टी समोर आणणार आहे. या चित्रपटाची कथा मनाला भावणारी आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.