अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!, भाऊबीज स्पेशल लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला
‘कशा असतात ह्या बायका’ असे शीर्षक असलेला हा लघुपट घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित आहे. (Let's understand with actress Tejashree Pradhan 'Kashya Astat hya Bayka' !, Bhaubij Special Short Film)
मुंबई : या भाऊबीजेला भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणाऱ्या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan), अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijit Khandkekar) यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या भावस्पर्शी लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण करत आहे.
‘कशा असतात ह्या बायका’ असे शीर्षक असलेला हा लघुपट घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणाऱ्या सर्व महिलांना समर्पित आहे. विशेष म्हणजे, स्त्रियांच्या मनाला स्पर्श करणारा हा लघुपट प्रस्तुत केला आहे एका पुरुषांचा शर्टिंग ब्रॅंड ’कॉटन किंग’ यांनी. स्त्रियांच्या सन्मानार्थ कॉटन किंगने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे.
फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर मिळणार पाहायला
‘कशा असतात ह्या बायका’ हा लघुपट सोशल मीडियावर म्हणजेच फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर पाहायला मिळेल. अदभूत क्रिएटीव्हज निर्मित हा लघुपट दिग्दर्शित केला आहे वैभव पंडित यांनी आणि मोनिका धारणकर यांनी लिहिला लिहिला आहे.
या लघुपटामध्ये एक महत्वाची बाब आहे, ती अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने एक महत्त्वाचा संदेश देते. अप्रत्यक्षपणे, ही शॉर्ट्फिल्म नवीन पिढीच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते. जरी हा भाऊबीज लघुपट असला तरी कथा केवळ बहिणीबद्दल नाही. ती आपल्या समाजातील बहुतांश महिलांची भावना व्यक्त करते. तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी आहे.
View this post on Instagram
अदभूत क्रिएटिव्ह्सचे संस्थापक आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर वैभव पंडित म्हणतात, ”दिवाळीच्या निमित्ताने शॉर्ट्फिल्म बनवण्य़ासाठी कॉटनकिंगकडून महिलांच्या भावना व्यक्त करणारी माहिती मिळणे विलक्षण होते. उत्तम चर्चा, विचारमंथन आणि अनेकवेळा लिखाण केल्यानंतर आम्ही कथेची योग्य नस पकडू शकलो. कॉटनकिंगने आम्हाला जी मोकळीक दिली, जो पाठिंबा दिला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.’’
“आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणॆ बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे,” असे लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे मालक कौशिक मराठे यांनी सांगितले.
चला, थोडे आणखी समजून घेऊया ’कशा असतात ह्या बायका’!
संबंधित बातम्या
पोट सुटलेला सैफ अली खान, तर रंगीबेरंगी अवतारातील राणी मुखर्जी, ‘बंटी और बबली 2’ची पहिली झलक पाहिलीत?
‘देवयानी’ फेम शिवानी सुर्वे लवकर प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या चित्रपटातून करणार दमदार एण्ट्री!