मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात मानाचा समजला जाणारा आणि कलाकार, रसिकांचे ज्या पुरस्कार सोहळयाकडे विशेष लक्ष असते, असा सोहळा म्हणजे ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वच गोष्टी नावीन्यतेनं नटलेल्या असतात. त्यात यंदाच्या सोहळयाची खासियत जरा वेगळी आहे. यंदाचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयात गेल्या 10 वर्षातील दर्जेदार कलाकृतींचा गौरव केला जाणार आहे. 4 डिसेंबरला हा सोहळा रंगणार आहे.
‘झी टॉकीज’ आयोजित हा सन्मान सोहळा रसिकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतो. ‘झी टॉकीज’ची ही अभिनव संकल्पना मराठी सिनेसृष्टीत चांगलीच नावाजली गेली. यातील विजेत्यांची निवड थेट प्रेक्षकांकडून केली जाते. त्यामुळे या सुवर्णसोहळ्यात प्रेक्षक कोणाला महाविजेता ठरवणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. नुकतीच या सोहळ्यातील पुरस्कारांची नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्ण दशक सोहळ्यामध्ये 12 श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. यामध्ये फेवरेट चित्रपट, फेवरेट दिग्दर्शक, फेवरेट अभिनेता, फेवरेट अभिनेत्री, फेवरेट सहाय्यक अभिनेता, फेवरेट सहाय्यक अभिनेत्री, फेवरेट खलनायक, फेवरेट गीत, फेवरेट गायक, फेवरेट गायिका आणि फेवरेट पॉप्युलर फेस, फेवरेट स्टाईल आयकॉन असे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
2010- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
2011- मी सिंधुताई सपकाळ
2012- काकस्पर्श
2013- दुनियादारी
2014- लय भारी
2015- डॉ. प्रकाश बाबा आमटे
2016- सैराट
2017- फास्टर फेणे
2018- मुळशी पॅटर्न
2019- हिरकणी
2010- संतोष मांजरेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
2011- महेश मांजरेकर (लालबाग परळ )
2012- महेश मांजरेकर (काकस्पर्श)
2013- संजय जाधव (दुनियादारी)
2014- निशिकांत कामत (लय भारी)
2015- परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी)
2016- नागराज मंजुळे (सैराट)
2017- अदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
2018- प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)
2019- संजय जाधव (खारी बिस्कीट)
2010- सचिन खेडेकर(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय)
2011- सचिन खेडेकर(ताऱ्यांचे बेट)
2012- सचिन खेडकर(काकस्पर्श)
2013- स्वप्निल जोशी (दुनियादारी)
2014 – रितेश देशमुख(लय भारी)
2015- अंकुश चौधरी (क्लासमेट्स)
2016- आकाश ठोसर (सैराट)
2017- अमेय वाघ (फास्टर फेणे)
2018- सुबोध भावे (पुष्पक विमान)
2019- ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)
2010- सोनाली कुलकर्णी (नटरंग)
2011- तेजस्विनी पंडित (मी सिंधुताई सपकाळ)
2012- अमृता खानविलकर (झकास)
2013- सई ताम्हणकर (दुनियादारी)
2014- केतकी माटेगावकर (टाइमपास)
2015- मुक्ता बर्वे (डबल सीट)
2016- रिंकू राजगुरू (सैराट)
2017- सई ताम्हणकर (जाऊंद्याना बाळासाहेब)
2018- माधुरी दीक्षित (बकेट लिस्ट)
2019- सोनाली कुलकर्णी (हिरकणी)
2011- सिद्धार्थ जाधव(लालबाग परळ)
2012- जितेंद्र जोशी(झकास)
2013- अंकुश चौधरी (दुनियादारी)
2014- पुष्कर श्रोत्री (रेगे)
2015- वैभव मांगले (टाइमपास2)
2016- तानाजी गालगुंडे (सैराट)
2017- सचिन खेडेकर (मुरांबा)
2018- नागराज मंजुळे (नाळ)
2019- प्रसाद ओक (हिरकणी)
2011- विशाखा सुभेदार (मस्त चाललंय आमचं )
2012- सविता मालपेकर(काकस्पर्श)
2013- उर्मिला कानिटकर(दुनियादारी)
2014- तन्वी आझमी(लय भारी)
2015- सई ताम्हणकर (क्लासमेट्स )
2016- छाया कदम (सैराट)
2017- शिल्पा तुळसकर (बॉइज)
2018- मृणाल कुलकर्णी (ये रे ये रे पैसा)
2019- मृणाल कुलकर्णी(फत्तेशिकस्त)
2010- सयाजी शिंदे (गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा)
2011- सचिन खेडेकर (फक्त लढ म्हणा)
2012- वैभव मांगले (काकस्पर्श)
2013- जितेंद्र जोशी (दुनियादारी)
2014-शरद केळकर (लय भारी)
2016- सचिन पिळगावकर (कट्यार काळजात घुसली)
2017- गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
2018- प्रवीण तरडे (मुळशी पॅटर्न)
2010- वाजले की बारा (नटरंग )
2011- हे भास्करा मी (सिंधुताई सपकाळ )
2012- गणाधीश (मोरया )
2013- टिक टिक वाजते (दुनियादारी)
2014- माउली माउली(लय भारी)
2015- किती सांगायचंय मला (डबल सीट)
2016- झिंगाट(सैराट)
2017- हृदयात वाजे समथिंग(ती सध्या काय करते)
2018- जाऊ दे न व (नाळ)
2019- तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
2010- अजय गोगावले -खेळ मांडला (नटरंग)
2011- सुरेश वाडकर- हे भास्करा (मी सिंधुताई सपकाळ)
2012- अवधूत गुप्ते – गणाधीश (मोरया )
2013- सोनू निगम – टिक टिक (वाजते दुनियादारी)
2014- अजय गोगावले – माउली माउली (लय भारी)
2015- जसराज जोशी – किती सांगायचंय मला (डबल सीट)
2016- अजय-अतुल-झिंगाट (सैराट)
2017- कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर-लग्नाळू(बॉइज)
2018- अजय गोगावले- देवाक काळजी(रेडु)
2019- आदर्श शिंदे-तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
2010- बेला शेंडे – वाजले की बारा (नटरंग)
2011- बेला शेंडे – आज म्हारे घर पावण(बालगंधर्व )
2012- उर्मिला धनगर – वेलकम हो राया वेलकम (देऊळ)
2013- सायली पंकज – टिक टिक वाजते (दुनियादारी)
2014- केतकी माटेगावकर – मला वेड लागले प्रेमाचे (टाइमपास)
2015- आनंदी जोशी – किती सांगायचंय मला (डबल सीट)
2016- श्रेया घोषाल – आत्ताच बया का बावरलं (सैराट)
2017- आर्या आंबेकर – हृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)
2018- वैशाली सामंत – खंडाळा घाट (ये रे ये रे पैसा)
2019- रोंकिनी गुप्ता – तुला जपणार आहे (खारी बिस्कीट)
सोनाली कुलकर्णी
क्रांती रेडकर
केतकी माटेगावकर
सई ताम्हणकर
अमृता खानविलकर
प्रिया बापट
रिंकू राजगुरू
वैदेही परशुरामी
शिवानी सुर्वे
अंकुश चौधरी
अनिकेत विश्वासराव
स्वप्नील जोशी
रितेश देशमुख
आकाश ठोसर
अमेय वाघ
उत्तम संकल्पना, नेत्रदीपक सादरीकरणआणि खुमासदार सूत्रसंचालन याने ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ नेहमीच गाजत राहिला आणि रसिक प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला आहे. गेली 10 वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करणारा हा सोहळा यंदा आपलं सुवर्ण दशक साजरा करतोय, त्यामुळे यंदा नेमकं काय विशेष असणार? महाराष्ट्राचा फेवरेट कोण ठरणार? याची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांना आहे. आपलं वेगळेपण जपत रंगणारा हा दिमाखदार सोहळा यंदाही मनोरजंनाची परंपरा कायम ठेवीत प्रेक्षकांचं दिलखुलास रंजन करेल यात शंका नाही.