Mangesh Desai: ‘ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत’; गाडीच्या अपघातानंतर मंगेश देसाई यांची पोस्ट

मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला होता. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता आणि सुदैवाने त्यातत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Mangesh Desai: 'ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत'; गाडीच्या अपघातानंतर मंगेश देसाई यांची पोस्ट
मंगेश देसाई यांच्या गाडीचे फोटोImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 10:03 AM

अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या गाडीचा रविवारी अपघात (Car Accident) झाला. मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला होता. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता आणि सुदैवाने त्यातत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु मंगेश यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी मंगेश देसाई यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपण सुखरुप असल्याची माहिती दिली.

‘आज झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचं नुकसान झालं आहे, ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. काळजी नसावी. धन्यवाद,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मंगेश देसाईंच्या गाडीचं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. आपण सुखरुप असल्याची पोस्ट लिहिताच त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.

हे सुद्धा वाचा

मंगेश देसाई यांची पोस्ट-

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाई यांनी आपलं स्थान निर्माण केलं. इतकी वर्षे अभिनय केल्यानंतर मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. साहिल मोशन ही निर्मिती संस्था त्यांनी स्थापन केली असून ‘धर्मवीर’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. ‘एक अलबेला’, ‘खेळ मांडला’सारखे संवेदनशील चित्रपट, क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेश यांनी अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन त्यांनी निर्माता म्हणून ‘धर्मवीर’ या चित्रपटातूनही कामाची छाप पाडली. चित्रपट निर्मितीविषयी ते म्हणाले होते की, “एवढी वर्षे अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकलं आहे.”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.