Manisha Kelkar | अभिनेत्रीच नव्हे तर, फॉर्म्युला फोर कार रेसरही, अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन!

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री, तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकर (Manisha Kelkar) हिने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफोरमेशन केलं आहे.

Manisha Kelkar | अभिनेत्रीच नव्हे तर, फॉर्म्युला फोर कार रेसरही, अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन!
Manisha Kelkar
Follow us
| Updated on: Nov 20, 2021 | 12:02 PM

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सगळेच लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यात मराठी सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अशीच एक मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री, तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकर (Manisha Kelkar) हिने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफोरमेशन केलं आहे. यात मनिषाला तिचा फिटनेस कोच व आहारतज्ञ अक्षय कदम याने साथ दिली. तिने नुकताच बॉडी ट्रान्सफॉरमेशनचा व्हिडीओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला भरघोस प्रतिसाद दिला आहे.

आजवर मनिषा केळकरने ‘ह्यांचा काही नेम नाही’, ‘मिशन पॉसिबल’, ‘चंद्रकोर’, ‘वंशवेल’ असे मराठी सिनेमे केलेत, तर ‘लॉटरी’ आणि ‘बंदूक’ या हिंदी सिनेमांमध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमांव्यतिरीक्त मनिषाने अनेक कार्यक्रमात निवेदनही केले आहे. त्यानंतर 2018मध्ये मनिषाने फॉर्म्युला फोर कार रेसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून, त्या ध्येयाकडे वाटचाल केली.

आता पुन्हा पुढच्या प्रवासाला सज्ज झालेय!

अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकर तिच्या बॉडी ट्रान्सफोरमेशन विषयी सांगते, ‘लॉकडाऊनपूर्वी माझा कार अपघात झाला. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की, मी आता कार रेसींग करू शकणार नाही. परंतु, मी उपचारानंतर फिजीओ थेरपी सुरू केली आणि हळूहळू रिकव्हर झाले. त्यानंतर काही महिन्यांनी मी फिटनेस कोच व न्यूट्रीशनीस्ट अक्षय कदम यांच्या सहाय्याने वर्कआऊट करण्यास सुरूवात केली. मी मोटर स्पोर्ट सुरू केलं, तेव्हा मला खूपच अशक्तपणा जाणवत होता. परंतु, वर्कआऊटमुळे माझ्यातील मस्सल पावर, स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. आणि रेसींगसाठी ते फार महत्त्वाचं असतं. त्या कार अपघातामुळे मी फार खचून गेलेले. परंतु व्यायाम, पौष्टीक डायट व सातत्य यामुळे मी आता पुन्हा एकदा अभिनय आणि कार रेसींग करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.’

मनीषाने जिद्दीने करून दाखवलं!

मनिषाच्या ट्रेनिंगबाबत फिटनेस कोच अक्षय कदम सांगतो, ‘मला अजूनही मनिषा यांच्या वर्कआऊटचा पहिला दिवस आठवतोय. त्यांना बेसीक स्टेप करताना सुद्धा फार त्रास व्हायचा. पुशअप्स, स्क्वॅट्स, डेडलीफ्ट करता येत नव्हत्या. परंतु आता त्या पुशअप्स, स्क्वॅट्स, डेडलीफ्ट सहजरीत्या करतात. तसेच पाच महिन्यांपूर्वी आम्ही 1 किलोच्या डंबेल्सने वर्कआऊट करायला सुरूवात केलेली आणि आता त्या 50 किलोची डेडलीफ्ट सहजपणे करतात. त्यांच्यासाठी बॉडी ट्रान्सफोरमेशनचा हा संपूर्ण प्रवास सोप्पा नव्हता. परंतु अभिनय आणि रेसींग कारचं स्वप्न जिद्दीने पाहणाऱ्या मनिषा यांनी ते करून दाखवलं.’

हेही वाचा :

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: कतरिना-विकी करणार लग्नाची घोषणा, लवकरच मिळणार लग्नाचं आमंत्रण!

Happy Birthday Tusshar Kapoor | बिन लग्नाचा पिता बनून सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, वाचा अभिनेता तुषार कपूरबद्दल…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.