वडिलांचं उदाहरण देत प्रविण तरडेंचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ सल्ला, म्हणाले…
अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकला एक व्हीडिओ शेअर करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 'मुळशी पॅटर्न' स्टाईल सल्ला दिला आहे.
मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarade) यांनी त्यांच्या फेसबुकला (Facebook) एक व्हीडिओ शेअर करत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल (Mulshi Pattern Style) सल्ला दिला आहे. प्रविण तरडे हे त्यांच्या स्वत : च्या शेतात गेले तेव्हा तिथे त्यांचे वडिल शेतात काम करत होते. त्याचा त्यांनी एक व्हीडिओ शूट केला आणि तो आपल्या फेसबुकवर शेअर केला. त्यात त्यांनी शेतीची सध्याची परिस्थिती आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला. त्यांनी म्हटलं की “राज्यातील शेतकऱ्यांनी कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तरी खचायचं नाही. शेती करत राहायची कारण शेती विकायची नसते. शेती राखायची असते, हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना न खचता शेती करण्याचा सल्ला दिला. सोबतच राखलेली शेती अशी कसायची असते, असं प्रविण तरडे म्हणाले.
प्रविण तरडेंची फेसबुक पोस्ट
अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकला एक व्हीडिओ शेअर केला आहे. ते त्यांच्या शेतात गेले आहेत. प्रविण तरडेंचे वडिल तेव्हा शेतात काम करत होते. तेव्हा त्यांनी एक व्हीडिओ शूट केला आणि तो आपल्या फेसबुकवर शेअर केला. या व्हीडिओत त्यांनी शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती सांगितली आहे. त्यांच्या वडिलांनी पाच किलो वाटाणा पेरला पण रोग पडल्यामुळे हाती केवळ अर्धा किलो वाटाणा लागल्याचं त्यांनी सांगितलं. पण तरिही न खचता माझे वडिल शेती करतात. तसंच तुम्हीही शेती करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
प्रविण तरडेंचा शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल सल्ला
प्रविण तरडेंचा शेतकऱ्यांना ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल सल्ला दिलाय.”राज्यातील शेतकऱ्यांनी कायम एक लक्षात ठेवलं पाहिजे की कितीही संकटं आली तरी खचायचं नाही. शेती करत राहायची कारण शेती विकायची नसते. शेती राखायची असते, हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना न खचता शेती करण्याचा सल्ला दिला. सोबतच राखलेली शेती अशीच कसायची असते, असं प्रविण तरडे म्हणाले.
प्रविण तरडे त्यांच्या शेतात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या शेतीचा व्हीडिओ आपल्या फेसबुकवर शेअर केला. यात त्यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
संबंधित बातम्या