हरीश दुधाडेची नवी इनिंग सुरू, मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात हरिशचं पदार्पण

हरीश दुधाडेची एक नवी इनिंग आता सुरु झाली आहे. तो एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

हरीश दुधाडेची नवी इनिंग सुरू, मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात हरिशचं पदार्पण
हरीश दुधाडे
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 2:25 PM

मुंबई : सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळवत असलेल्या तुमची मुलगी काय करते ( Tumachi Mulagi Kay karte) या मालिकेतील इन्स्पेक्टर भोसले, फत्तेशिक्तमधील (Fatteshikast) बहिर्जी नाईक अशा उत्तमोत्तम भूमिकांतूनअभिनेता हरीश दुधाडे (Harish Dudhade) आपल्याला भेटला आहे. आगामी पावनखिंड या चित्रपटातही तो आपल्याला महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हरीशची एक नवी इनिंग आता सुरु झाली आहे. तो एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचं नाव आणि इतर तपशील लवकरच तो जाहीर करणार आहे. त्यामुळे त्याचा हा नवा सिनेमा कोणता असणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आतापर्यंत अभिनेता म्हणून हरीशचं काम उल्लेखनीय आहे. आता तो त्याच्या करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळतोय. या वाटेवरचा त्याचा प्रवास त्याच्या चाहत्यांना  कसा वाटतो हे येत्या काळात कळेल.

कोण आहे हरीश दुधाडे?

हरीश मूळचा नगरचा आहे. त्याने शाळेतल्या एकांकिकांपासून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर गणेशोत्सवात वऱ्हाड निघालंय लंडनला या एकपात्री प्रयोगातील प्रवेश सादर केले. कॉलेजला असताना भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकामुळे हरीश भरत जाधव यांचा फॅन झाला. त्यानंतर पुण्यात शिक्षणासाठी गेल्यावर पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अमिताभ बच्चन यांच्या तीन पत्ती या चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करण्याची, त्यानंतर भरत जाधव यांची भेट झाल्यावर अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्याचं नक्की झालं.

अभिनयात करिअर करण्यासाठी म्हणून हरीशनं मुंबई गाठली. “कन्यादान” या मालिकेपासून सुरू झालेला हरीशचा प्रवास आजपर्यंत चढत्या आलेखानं सुरू आहे. गुंडा पुरुष देव, सुहासिनी, माझे मन तुझे झाले, नकळत सारे घडले, तुझ्या इश्काचा नाद खुळा, सरस्वती, तुमची मुलगी काय करते अशा उत्तमोत्तम मालिका हरीशच्या वाट्याला आल्या. या मालिकांतून हरीश घराघरांत पोहोचला. तर मेनका उर्वशी, फर्जंद, फत्तेशिकस्त अशा चित्रपटांतून हरीशनं अभिनेता म्हणून आपलं स्थान निर्माण केलं. आगामी मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित “मनाचे श्लोक” या चित्रपटातही हरीश दिसणार असून नक्षलबाडी, प्लॅनेट मराठीच्या ‘जॉबलेस’ या वेबसिरीज मध्येही तो झळकला.

आजवरच्या अभिनय प्रवासाविषयी हरीश सांगतो, की “पुण्यात असताना श्यामराव जोशी यांच्याकडून अभिनय म्हणजे काय हे शिकायला मिळालं. मालिका करायला लागल्यावर माझ्या सुदैवानं आत्तापर्यंत उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाट्याला आल्या. प्रत्येक मालिका, चित्रपटात दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या क्षेत्रात माझे अनेक गुरू झाले. दिग्पाल लांजेकर, भीमराव मुडे, विनोद लव्हेकर असे दिग्दर्शक लाभले. प्रत्येक प्रोजेक्टमधून नवनवे मित्र जोडले गेले. अभिनेत्री मधुरा वेलणकर- साटम आणि निर्माती मनवा नाईक यांनी मला कायम मला उत्तम मार्गदर्शन केले सध्या सुरू असलेल्या तुमची मुलगी काय करते या मालिकेतील इन्स्पेक्टर भोसलेच्या भूमिकेला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे. चाहत्यांनी दिलेलं प्रेम माझा उत्साह वाढवणारा आहे.”

“आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मला प्रत्येकवेळी करायला मिळाली. कठीण भूमिकांसाठी दिग्दर्शक आवर्जून मला विचारणा करतात, अभिनेता म्हणून माझ्यावर विश्वास दाखवतात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. आजुबाजूच्या सर्व कलाकारांकडून शिकून दर्जेदार काम करण्यावरच माझा कायम भर राहील. येत्या काळातही अभिनेता म्हणून आणि निर्माता म्हणून काही उत्तमोत्तम प्रोजेक्ट प्रेक्षकांसमोर आणण्याचा मानस आहे”, अशी भावना हरीशनं व्यक्त केली.

संबंधित बातम्या

रसिका सुनिलचा लेट पण थेट व्हॅलेंटाईन डे!, फोटो शेअर करत म्हणाली…

देवेंद्रजी 30-35 पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, अमृता फडणवीसांची किचनमध्ये ‘कल्ला’कारी

Aai Kuthe Kay Karte : घरच्यांनी घेतला अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय, अरुंधती घेणार मोठा निर्णय

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.