“तो मी नव्हेच! ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका”, Aap ची उमेदवार यादी जाहीर, अभिनेता Sandeep Pathak ची प्रतिक्रिया…

'आप'ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी अभिनेता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय. त्यावर आता संदीप पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.

तो मी नव्हेच! 'आप'ल्याला ह्यात ओढू नका, Aap ची उमेदवार यादी जाहीर, अभिनेता Sandeep Pathak ची प्रतिक्रिया...
संदीप पाठक, अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 1:01 PM

मुंबई : सध्या पंजाबमध्ये आपचा (Aap) बोलबाला आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आता राज्यसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) चाणक्य (Chankya) म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक (Sandeep Pathak) यांना आपने पंजाबमधून राज्यसभेचं (Rajyasabha) तिकीट दिलं आहे. पंजाबमध्ये (Punjab) आपची सत्ता येण्यात संदीप पाठक यांचा मोठा हात होता. पाठक यांनी राज्यसभेसाठी नामांकन अर्जही भरला आहे. पण या सगळ्यात मराठी अभिनेता संदीप पाठक (Marathi Actor Sandeep Pathak) चर्चेत आला आहे. ‘आप’ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी अभिनेता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय. त्यावर आता संदीप पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी अभिनेता संदीप पाठकने आप उमेदवार म्हणून त्याचे फोटो वापरण्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “तो मी नव्हेच! आप चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, असं ट्विट संदीप पाठक ने केलं आहे. यात त्याने आम आदमी पक्षाला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री,आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टॅग केलंय.

संदीपच्या या ट्विटच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तर काहींनी उपरोधाने संदीपचं अभिनंदन केलं आहे.

संदीप पाठकचं ट्विट

आपचे उमेदवार संदीप पाठक कोण आहेत?

आप नेते संदीप पाठक यांची पंजाबची विधानसभा निवडणूक जिंकण्यात महत्वाची भूमिका होती. त्यांनी गेल्या तीन वर्षापासून पंजाबमध्ये तळ ठोकून बुथ लेव्हलला संघटना मजबूत केली होती. त्यामुळेच पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आहे. ते आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते आपचे राष्ट्रीय संयोजक आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणूनही ते ओळखले जातात.

संबंधित बातम्या

“ते म्हणतात… सगळं सेमच आहे”, Kranti Redkar ने सांगितला पती Sameer wankhede सोबतचा शॉपिंगचा किस्सा

मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू

The Kashmir Files मध्ये वाशिमच्या मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली भूमिका; दोन महिने कडाक्याच्या थंडीत केलं शूटिंग

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.