‘आणा लाल मोठी गाडी’, माधुरी पवारचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सप्तसूर म्युझिकची निर्मिती

| Updated on: May 30, 2022 | 8:10 AM

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केला जाईल.

आणा लाल मोठी गाडी, माधुरी पवारचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, सप्तसूर म्युझिकची निर्मिती
Follow us on

मुंबई : सध्या जोरदार चर्चेत असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार (madhuri pawar) ‘आणा मला जरतारी साडी, साडीसंगे आणा लाल मोठी गाडी’ (aana lal mothi gadi) असे धमाल शब्द असलेल्या ‘लाल मोठी गाडी’ ह्या सप्तसूर म्युझिकच्या नव्या म्युझिक व्हिडिओतून प्रेक्षकांच्या भेटीला आली असून नुकताच हा व्हिडीओ सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर लाँच करण्यात आला आहे.माधुरी पवारनं या धमाल गाण्यावर ठुमके लगावले आहेत.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित केला जाईल. या गाण्याचं लेखन माधवी देवळणकर यांनी केलं आहे, तर अमेय मुळे यांचं संगीत असलेलं हे गाणं लरिसा अल्मेडा या नव्या गायिकेनं गायलं आहे. संतोष भांगरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. अंकित शिंदे आणि दिव्या घाग ह्यांनी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे.

ठसकेदार आणि दिमाखदार अशी ही लावणी नव्या ढंगातली आहे. धमाल शब्द आणि उडती चाल असलेलं हे गाणं लगेचंच ऐकणाऱ्याचं लक्ष वेधून घेतं. सप्तसूर म्युझिकनं आतापर्यंत कोळीगीत, प्रेमगीत असे वेगवेगळे म्युझिक व्हिडिओ सादर केले आहेत. त्यात आता लाल मोठी गाडी या लावणी म्युझिक व्हिडिओची भर पडत आहे. आजवरच्या म्युझिक व्हिडिओंना मिळालेल्या दमदार प्रतिसादाप्रमाणेच लाल मोठी गाडीसुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवेल यात शंका नाही.

माधुरीच्या टक्कलची चर्चा

प्रत्येक अभिनेत्रीला तिच्या करिअरमध्ये एकदा तरी ग्लॅमरस किंवा बोल्ड कॅरेक्टर करायची इच्छा असते. पण टक्कल करून प्रेक्षकांना काय वाटेल याची पर्वा न करता केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ती भूमिका वठवण्याची हिंमत मोजक्याच अभिनेत्री करतात. हे मोठं शिवधनुष्य अभिनेत्री माधुरी पवार हिने लीलया पेललं आहे. तिच्या पहिल्याच ‘रानबाजार’  या वेब सीरिज मधून याची प्रचिती येते. कोणत्याही ‘स्टीरिओ टाईप’मध्ये न अडकता तिने तिच्या अभिनयाच नाणं खणखणीत वाजवलं आहे. राजकारणातील एक महत्वकांशी आणि करारी स्त्री ची भूमिका अभिनेत्री माधुरी पवार हीने यामध्ये चोख साकारली आहे. अलिकडच्या काळात ग्लॅमरस दुनियेत जिथे अभिनेत्री आपल्या लूकबद्दल इतक्या जागरूक असतात अशा वेळेस माधुरीने टक्कल करून भूमिका साकारणं हे खरंच वाखाण्याजोगे आहे.