‘विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ लेखन म्हणुन वरचा दर्जा..’, हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया!

हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर, अनेक कलाकारांनीही हेमंगीचे खूप कौतुक केले आहे. अनेक कलाकारांनी तिची ही पोस्ट शेअर केली आहे.

‘विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ लेखन म्हणुन वरचा दर्जा..’, हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’वर कलाकारांच्या प्रतिक्रिया!
हेमांगी कवी
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 11:41 AM

मुंबई : “बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे (nipples, tits) आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना, ब्रा वापरायची की नाही, हा सर्वस्वी त्या बाईचा choice असू शकतो! मग ती घरी असो किंवा social media वर किंवा कुठेही! हाँ त्यावरून judge करण्याचा, त्याबद्दल घाणेरडया चर्चा आणि gossip करण्याचा सुद्धा ज्याचा त्याचा choice”, असं म्हणत अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) स्त्रियांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य केले आहे.

हेमांगीच्या या बेधडक पोस्ट नंतर नेटकऱ्यांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले आहे. या दरम्यान अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तर, अनेक कलाकारांनीही हेमंगीचे खूप कौतुक केले आहे. अनेक कलाकारांनी तिची ही पोस्ट शेअर केली आहे.

पाहा कालकार काय म्हणाले…

‘विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ लेखन म्हणुन वरचा दर्जा.. साहित्य म्हणुन कालातीत..तु लढ हेमांगी’, असं म्हणत अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी हेमांगीला आपला पाठींबा दर्शवला आहे. ‘तूच खरी इंल्फूएन्सर आहेस. आम्हाला तुझा अभिमान वाटतो’, असे अभिजित केळकर म्हणाला.

‘व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे आपल्या इथे फक्त पुस्तकातील वाक्य आहेत. आवडलं ! हवं तसं व्यक्त होत राहा, बिनदिक्कत बिनधास्त’, असं म्हणत सागर तळाशीकर यांनी देखील हेमंगीचे कौतुक केले आहे. ‘तू फार कमाल लिहिलंयस’, असं म्हणत मधुरा देशपांडेने हेमांगीचं कौतुक केलं आहे. ‘क्या बात हेमांगी सॉलिड, लय भारी… वाचून सुद्धा हायसं वाटलं गं….’, असं अभिनेत्री वीणा जामकर म्हणाल्या. तर, अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी देखील हेमांगी कवीची पोस्ट शेअर केली आहे.

महिलांनी बुजरेपणा सोडून व्यक्त व्हावं!

महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणो ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!

(Marathi celebrities reaction on Hemangi Kavi viral post)

हेही वाचा :

“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, त्यांनी…” बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.