महिला दिनानिमित्त ‘अनन्या’चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री हृता दुर्गुळे अनन्या या सिनेमात अनन्याचं पात्र साकारतेय. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महिला दिनानिमित्त 'अनन्या'चे पोस्टर रिलीज, हृता दुर्गुळेचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
'अनन्या'- सिनेमा, हृता दुर्गुळे
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 11:43 AM

मुंबई : ‘अनन्या’ म्हणजे वेगळेपण… इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास ‘अनन्या’ (Ananya Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी सकारात्मक टॅगलाईन असलेल्या ‘अनन्या‘ या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या (Womens Day) निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) अनन्याचं पात्र साकारतेय. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी ‘अनन्या’ 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपल्या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे म्हणते, “आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे.’’ तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव म्हणतात, ”आज महिला दिनाच्या निमित्ताने हे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.” निर्माता संजय छाब्रिया म्हणतात, ”जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. ‘अनन्या’मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी ‘अनन्या’ 10 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हृता दुर्गुळे या सिनेमात काम करतेय. याआधी तिने झी युवावरच्या फुलपाखरू मालिकेत काम केलं आहे. सध्या झी मराठीवर तिची मन उडू उडू झालं ही मालिका सुरू आहे.

संबंधित बातम्या

“नाटकी कलाकारांची झुंडशाही, स्वयंघोषित स्टार…”, ‘ती’ पोस्ट झुंडबाबत नव्हती, महेश टिळेकरांचं स्पष्टीकरण

Jhund Video: अच्छा फिल्ममेकर नहीं, पागल भी है, नीडर भी, नागराजच्या प्रेमात अनुराग कश्यप जेव्हा हसतो-रडतो…

Jhund: नागराजच्या झुंडवर कोर्टात निर्णय, निर्मात्याला 10 लाखाचा दंड, सिनेमा स्थगितीचीही मागणी

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.