Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!

दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पुणे येथे गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त चित्रपटाच्या टीमसह नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार 'वन फोर थ्री'!
143
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 1:28 PM

मुंबई : रोमँटिक चित्रपटांच्या चलतीमध्ये ‘वन फोर थ्री’ (One Four Three) चित्रपटानेही आपले नाव यादीत नोंदविले आहे. प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येत ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेल्या नव्याकोऱ्या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, पुणे येथे गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन समस्त चित्रपटाच्या टीमसह नव्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाचे विविध रंग मांडत या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. तर, अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाच संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे.

चित्रपटाला खास साऊथ टच!

विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर, छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. हे आपलं काळीज हाय या ‘वन फोर थ्री’ चित्रपटाच्या टॅगलाईनने आधीच धुमाकूळ घातला असताना हा चित्रपट काय नवे घेऊन येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चित्रपटाच्या पोस्टरची बातमी ऐकून नक्कीच सर्वांना आनंद झाला असेल, यांत शंकाच नाही. हाच आनंद द्विगुणित करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून, येत्या 11 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ आठवड्यामध्ये हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस येणार आहे. याबद्दल बोलताना दिग्दर्शक योगेश भोसले असे म्हणाले की, या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेमाचे वेगवेगळे रंग पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे ‘वन फोर थ्री’ चित्रपटासोबत आनंदमयी जाईल, असे आव्हान योगेश भोसले यांनी केले आहे. प्रेमाचे वेगळेपण या चित्रपटात कसे अनुभवता येणार, हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.

हेही वाचा :

उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!

Bigg Boss 15 | शॉकिंग! ‘बिग बॉस 15’मध्ये वाईल्ड कार्ड बनून एंट्री केलेले अभिजीत बिचुकले कोरोनाच्या विळख्यात!

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.