मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!

गायक, गीतकार प्रतापसिंग बोदडे यांनी अनेक गाणी लिहिली. लोकांसमोर सादरही केली. (Mother also cried listening to son's song, know what was the story?)

मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, 'बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!'; मन हेलावणारा किस्सा!
pratap singh bodade
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 4:13 PM

मुंबई: गायक, गीतकार प्रतापसिंग बोदडे यांनी अनेक गाणी लिहिली. लोकांसमोर सादरही केली. गायनाचे शेकडो कार्यक्रम केले. गावोगाव फिरले, वाड्या वस्त्यात गेले. यावेळी त्यांना अनेक अनुभवही आले. काही सुखद होते, काही दुखद होते. तर, काही काळीज पिळवटून टाकणारे होते. कवी, गायक वामनदादा कर्डक यांच्या ‘पाणी वाढ गं माय…’ या गाण्याचा किस्साही काहीसा असाच काळजी पिळवटून टाकणारा आहे. (Mother also cried listening to son’s song, know what was the story?)

पाणी वाढगं माय… अन् माय रडली

पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं, लय नही मागत भर माझं इवलसं गाडगं, पाणी वाढ गं माय, पाणी वाढ गं…

वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं हे गाणं त्याकाळात खूप गाजलं होतं. प्रतापसिंग बोदडे हे वामनदादांचे शिष्य होते. त्यामुळे बोदडे प्रत्येक गायनाच्या कार्यक्रमात हे गाणं हमखास गायचे. जळगावात बोदवड स्टेशन जवळ त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी प्रतापसिंग बोदडे यांचे आई-वडीलही आले होते. समोरच आई-वडील बसल्याने बोदडे पुरते रंगात आले होते. त्यांचा आवाजही चांगलाच लागला होता. त्यांनी वामनदादांच्या ‘पाणी वाढ गं माय’ या गाण्यानेच कार्यक्रमाची सुरुवात केली. या गाण्याशी एकरुप होऊन ते गात होते. बोदडे गात होते आणि हे गाणं ऐकून त्यांचे आई-वडील आणि प्रेक्षक रडत होते. संपूर्ण माहोल धीरगंभीर झाला होता. सकाळी जेव्हा बोदडे झोपेतून उठले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना जी विनंती केली ती हृदयाला हात घालणारीच होती. ‘बेटा प्रताप, मी तुझ्या पाया पडते. पण हे गाणं पुन्हा गाऊ नकोस’, असं म्हणत त्यांची आई ढसढसा रडू लागली. त्यामुळे बोदडेंच्या काळजात चर्रर्र झालं.

ज्यांनी गाणं लिहिलं तेही रडले

एखादा गीतकार गाणं लिहितो तेव्हा त्यालाही ते गाणं काय चमत्कार घडवू शकतं हे त्यालाही माहीत नसतं. आपणच लिहिलेलं गीत ऐकून एखादा गीतकार लढला असेल असं क्वचितच घडलं असेल. वामनदादा कर्डकांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. त्यांनी पाणी वाढ गं माय हे गाणं लिहिलं. हे गाणं अनेक गायकांनी गायलं. पण प्रतापसिंग बोदडे यांनी जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा हे गाणं ऐकून वामनदादांनाही अश्रू अनावर झाले होते. येवल्यात गाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला वामनदादाही आले होते. गुरु समोरच गाणं गावं लागत असल्याने बोदडे यांनी अगदी तल्लीन होऊन पाणी वाढ गं माय हे गाणं गायलं. हे गाणं ऐकून वामनदादांनाही अश्रू अनावर झाले आणि जनसागरही रडू लागला होता. ही मैफल आठवल्यावर आजही बोदडे गहिवरून जातात.

गाणं कसं सूचतं

कविता असो की गाणं हा अभिव्यक्तीचा अविष्कार असतो. त्याची निर्मिती प्रक्रिया अशी फूटपट्टीत मोजता येत नाही. प्रत्येकाची गाणं किंवा कविता निर्मितीची प्रक्रिया वेगळी असते. अनुभव, निरीक्षण, अनुकरण, अस्वस्थता, आनंद, सभोवताली घडणाऱ्या घटना, अचानक सूचणं… आदी अनेक गोष्टीच्या प्रभावातून कविता किंवा गाणं सूचतं. काहींना गाणं सूचताच ते पटकन कागदावर उतरलं जातं. तर काहींना आधी दोनच ओळी सूचतात आणि उरलेलं गाणं यथावकाश पूर्ण होतं. प्रतापसिंग बोदडे यांची गाणं लिहिण्याची पद्धत ही दोन्ही तऱ्हेची आहे. कागद, पेन हातात घेऊन ते गाणं लिहित बसत नाही. त्यांना सहज गाणं सूचतं आणि मग कागदावर उतरतं. कधी कधी दोनच ओळी सूचतात आणि नंतर पुढचं गाणं तयार होतं. त्यांची अनेक गाणी प्रासंगिक असतात. त्या त्यावेळी घडणाऱ्या घटनांचं, परिस्थितीचं चित्रण त्यांच्या गाण्यात असतं. त्यामुळे त्यांची गाणी कल्पनारम्य नसतात, ती अस्सल आणि वास्तववादी असतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (Mother also cried listening to son’s song, know what was the story?)

संबंधित बातम्या:

‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का?

पाचवीपर्यंतचं शिक्षण, केवळ 12 रागांचं माहिती; तरीही दर्जेदार गीते लिहिली, वाचा शिरवाळेंचे किस्से!

‘खंडोबा रायाचं याड बाई…’, ‘म्हातारा नवरा गंमतीला…’ ‘कशाचं खरं खोटं…’ या गाण्यांचा गीतकार माहीत आहे का?

(Mother also cried listening to son’s song, know what was the story?)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.