‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’साठी पुढे आले मृण्मयी देशपांडे आणि सुरेश वाडकर!
पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’चे हे दुसरे वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षात, ‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’ अर्थात ALT EFF ने पर्यावरण आणि हवामान संकटावर प्रेक्षकांना आकर्षक कथा आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’चे हे दुसरे वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षात, ‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’ अर्थात ALT EFF ने पर्यावरण आणि हवामान संकटावर प्रेक्षकांना आकर्षक कथा आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या महोत्सवाचा असा विश्वास आहे की, चित्रपट भावनिक असतात आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे सामर्थ्य त्यात आहे, हवामान संकटाची समज वैज्ञानिक कल्पनेच्या अस्पष्ट संकल्पनेतून मूर्त स्वरूपाकडे घेऊन जाता येते.
वर्षानुवर्षे अनेक सेलिब्रिटी आणि कलाकार यहा फिल्म फेस्टिव्हलशी जोडलेले आहेत. या वर्षी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे-राव आणि पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सारखे महान कलाकार या महोत्सवाला पाठिंबा देणार आहेत.
असे महोत्सव काळाची गरज!
याबद्दल सांगताना मृण्मयी देशपांडे राव म्हणाली की, ‘ALT EFF ही काळाची गरज आहे. आज आपल्याला आपल्या काळातील कठोर वास्तव प्रतिबिंबित करणारे असे महोत्सव हवे आहेत. दुर्दैवाने, हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंग हे आपले वास्तव बनले आहे आणि मला खूप आनंद आहे की, या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आपण पर्यावरणीय कथा साजऱ्या करत आहोत. मी या चित्रपट महोत्सवाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि मला आशा आहे की, याद्वारे आपण आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू आणि बदल घडवू.’
पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण!
पद्मश्री सुरेश वाडकर म्हणतात, “ALT EFF च्या टीमचा मला खूप अभिमान आहे, कारण त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून आजच्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकण्याची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. यातील चित्रपटांची अतिशय मनोरंजक आहे आणि मला काही आकर्षक कथा आवडल्या आहेत. मला खात्री आहे की, हा महोत्सव खूप यशस्वी होईल. मी सर्व सहभागींना शुभेच्छा देतो आणि मला आशा आहे की, हा महोत्सव इथून पुढेही असाच प्रगती करत राहील’.
पर्यावरण विषय हायलाईट केला जाणार…
‘ऑल लिविंग थिंग्स एनवायरनमेंटल फिल्म फेस्टिव्हल’ 9 ते 17 ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. 31 देशांतील 44 चित्रपट प्रदर्शित होतील, त्यापैकी 33 भारतात प्रदर्शित होतील. यात पर्यावरण हा विषय हायलाईट केला जाईल. हा महोत्सव सर्जनशील, शैक्षणिक, व्यवसाय, कार्यकर्ते, वैज्ञानिक आणि सरकारी समुदायांना नागरिकांशी जोडण्यासाठी आणि पर्यावरणीय कारणांसाठी आणि कृतीसाठी सामूहिक शक्ती निर्माण करण्यासाठी एकत्र आणतो.
हेही वाचा :
Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरची भटकंती, नो मेकअप लूकमध्ये फोटो शेअर
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार चिमुकली मंडळी, परी आणि स्वरामध्ये रंगणार जुगलबंदी!
Video | Bhandara | भंडाऱ्यात घटस्थापनेच्या दिवशी तरुणीने साकारली 3D रांगोळी#Bhandara #MaharashtraUnlock #TempleReopen #Navratri #CoronaGuidelines
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/ziPdpGfsrt
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021