Kiran Mane : मी बी कंबर कसलेली हाय… फेसबुकवर पोस्ट शेअर करत अभिनेते किरण माने यांनी दिला इशारा!
सोशल मीडियावर (Social Media) राजकारणाबाबत परखड मत व्यक्त केल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यावरून आता मोठा वाद देखील निर्माण झाला आहे.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) राजकारणाबाबत परखड मत व्यक्त केल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप स्वत: किरण माने यांनी केला आहे. त्यावरून आता मोठा वाद देखील निर्माण झाला आहे. माने यांना मालिकेतून काढून टाकल्यामुळे सोशल मीडयावर वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. लोकांनी माने यांना पाठिंबा दर्शवला असून भाजपवर टीका केली जात आहे. मात्र, आता किरण यांना व्यावसायिक कारणामुळे मालिकेमधून काढल्याचे देखील सांगितले जात आहे आणि हा वाद काही थांबताना दिसत नाही.
नुकताच किरण माने यांनी सोशल मीडियावर अजून एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत. अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे. करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे…चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.
बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच ! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!! अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.
किरण माने यांना मालिकेतून काढण्यामागे व्यावसायिक कारणं दिलं गेलं असल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय पोस्ट किंवा राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना मालिकेतून काढले नाहीये, असे सांगितले जात आहे. दरम्यान, नेमकी व्यावसायिक कारण देताना कोणत्या बाबी किरण माने यांच्याबाबत खटकल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मुलगी झाली हो मालिकेत काम करणाऱ्या किरण माने यांची मालिकेतून हकालपट्टी झाल्यानंतर मराठी कलाकार आणि राजकीय भूमिका हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
संबंधित बातम्या :
शरद पवारांकडे निर्मात्यांनी मांडली भूमिका, किरण माने प्रकरणाला वेगळे वळण
Kiran Mane : किरण माने यांच्या समर्थनार्थ ‘राधिका’ मैदानात, म्हणाली, ‘माझा त्यांना फुल्ल सपोर्ट!’