Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवात तुम्हाला नाचायला मिळालं नसेल तर तो तुमचा मुद्दा; सुबोध भावे असं का म्हणाले?

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यांचा उद्देश राष्ट्र शक्तीचा होता. आपल्यावर त्यावेळी ब्रिटिशांची बंधने होती, ब्रिटिश म्हणजे कोरोना. आता उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणपती मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा सुरूयं.

गणेशोत्सवात तुम्हाला नाचायला मिळालं नसेल तर तो तुमचा मुद्दा; सुबोध भावे असं का म्हणाले?
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 1:36 PM

मुंबई : संपूर्ण राज्यात गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) आगमनाची तयारी जोरदार सुरूयं. अनेक ठिकाणी तर सर्वांचे लाडके बाप्पा विराजमान देखील झालेत. बाॅलिवूडपासून ते मराठी कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होताना दिसतायंत. बाप्पांच्या आगमनाची वेगळीच एक धुम बघायला मिळतंय. सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या घरी देखील बाप्पांचे आगमन झाले आहे. यावेळी बोलताना सुबोध भावे म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्ष गणेशोत्सव नव्हता, पण आनंदावरती कसल विरजण नाही पडले. गेली दोन वर्ष कोरोना (Corona) होता, मात्र, मी उत्साहाने बाप्पांचे स्वागत केले होते. आनंदावरती विरजण नाही पडतं.

आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी दाखवणारा खास देखावा

पुढे सुबोध भावे बोलताना म्हणाले की, जर तुम्हाला नाचायला नाही मिळाले म्हणून तुम्ही नाराज असाल तर तो तुमचा मुद्दा आहे. मात्र माझ्या आनंदावरती काही फरक नाही पडला. कारण भक्तीवरती कधीच कसला फरक पडत नसतो. यावेळी आम्ही शाडूची मूर्ती तयार केली आहे. त्यात आम्ही आनंदी पृथ्वी आणि दुःखी पृथ्वी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पृथ्वीला किती दागिने हवेत तिचे दागिने म्हणजेच निसर्ग. विकासाच्या नावाखाली निसर्गाची वाट लावली जात आहे. विकास देखील व्हायला हवा पण निसर्ग देखील टिकायला हवा.

हे सुद्धा वाचा

तुम्ही पत्ते खेळता, दारू पिता त्यावेळी तुमच्या धार्मिक भावना कुठे, सुबोध भावेंचा सवाल

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कारण त्यांचा उद्देश राष्ट्र शक्तीचा होता. आपल्यावर त्यावेळी ब्रिटिशांची बंधने होती, ब्रिटिश म्हणजे कोरोना. आता उत्सवाचे स्वरूप बदलले आहे. गणपती मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा सुरूयं. तुझा बाप्पा मोठा की माझा अशी स्पर्धा नको. स्पर्धा नक्कीच असावी ती आमच्यात देखील आहे. मुर्त्यांमध्ये कसली स्पर्धा…आजकाल कोणाच्याही भावना कशामुळेही दुखवल्या जातात. आमच्याकडुन जरा काही झालं तर लगेच भावना दुखावल्या जातात. तुम्ही पत्ते खेळता, दारू पिता त्यावेळी तुमच्या धार्मिक भावना कुठे जातात. असेही सुबोध भावे म्हणाले आहेत.