नचिकेत देवस्थळी नवी क्राईम सीरीज, ऑडीओबुक स्वरुपात ऐका ‘सायको किलर’चा थरार!

निरंजन मेढेकर लिखित आणि अभिनेता नचिकेत देवस्थळी याच्या दमदार आवाजातल्या ‘सायको किलर’ला पहिल्या दिवसापासूनच श्रोत्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

नचिकेत देवस्थळी नवी क्राईम सीरीज, ऑडीओबुक स्वरुपात ऐका ‘सायको किलर’चा थरार!
सायको किलर
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:18 AM

मुंबई : तो येतोय…संध्याकाळी दारावर कुणाची अनोळखी थाप पडली तर लगेच दार उघडू नका! नव्वदच्या दशकातल्या शांत पुण्यात एकामागोमाग एक खुनांचं-हत्याकांडांचं गूढ सत्र सुरू झालंय. पोलिसांना या विचित्र गुन्ह्यांचा तपास काही केल्या लागत नाहीये. दुसरीकडे बातमीच्या नादात क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वे या सगळ्या घटनाक्रमांत त्याच्याही नकळत गुंतत चाललाय. या चक्रव्युहात एकदा फसलं की जिवंत बाहेर पडणं अशक्य आहे! पण हे त्याला तरी कुठं माहितीय? एका बातमीवरून सुरू झालेला हा विचित्र प्रवास निलेशचा शेवटचा श्वास घेऊनच संपेल?

‘स्टोरीटेल’वर गुरूवारी 23 सप्टेंबरला रिलीज झालेल्या ‘सायको किलर’ या क्राईम सिरीजचं हे उत्कंठावर्धक कथानक! निरंजन मेढेकर लिखित आणि अभिनेता नचिकेत देवस्थळी याच्या दमदार आवाजातल्या ‘सायको किलर’ला पहिल्या दिवसापासूनच श्रोत्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शहरात एकामागोमाग एक घडणाऱ्या हत्याकांडांभोवती आणि प्रसंगी जीव धोक्यात घालून पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या तरुण बातमीदाराभोवती या सीरीजची स्टोरीलाईन गुंफलेली आहे.

पुण्यातील हत्याकांडावर आधारित कथानक

‘सायको किलर’च्या मानसिकतेचा अभ्यास करत पोलिस अखेर त्याच्यापर्यंत पोचतात का, शहरात एकामागोमाग एक सुरू असलेली हत्याकांड थांबतात का, प्रसंगी या कादंबरीच्या नायकाला क्राईम रिपोर्टर निलेश सुर्वेला आपल्या प्राणांची बाजी लावायला लागते का या प्रश्नांची उत्तंर मिळवण्यासाठी सायको किलर ऐकायलाच हवी! या सीरीजचं कथानक पुण्यात घडलेल्या सगळ्यात मोठ्या हत्याकांडावरून प्रेरित आहे.

निरंजन मेढेकर लिखित कथा

निरंजन मेढेकर यांनी याआधी वेगवेगळ्या मराठी-इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये बातमीदारी केलेली असल्यानं बातमीदार-पत्रकारांचा संघर्ष त्यांना परिचित आहे. त्यामुळं या सिरीजमध्ये मराठी पत्रकारितेचं आणि बातमीदारांच्या भावविश्वाचं वास्तवदर्शी चित्रण झालंय. याआधी निरंजन मेढेकर यांनी ‘सीरियल किलर’ आणि ‘विनाशकाले’ या दोन क्राईम सीरीज ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या असून, त्यालाही श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ‘व्हायरस पुणे’ ही त्यांनी भावानुवाद केलेली ही सायफाय थ्रिलर सीरीज मुक्ता बर्वे यांच्या आवाजात प्रसिद्ध असून, ती श्रोत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

अभिनेता नचिकेत देवस्थळीचा आवाज

‘सुखन’, ‘महानिर्वाण’ या नाटकांमुळे, तर सध्या झी मराठीवर सुरू असलेल्या ‘ती सध्या परत येतीय’ या मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे चर्चेत असलेले अभिनेते नचिकेत देवस्थळी यांचा भारदस्त आवाज ‘सायको किलर’ला लाभलाय. या सीरीजमध्ये पत्रकार, पोलीस इन्स्पेक्टर, गुन्हेगार, मनोविकारतज्ज्ञ अशी वेगवेगळी पात्रं असली तरी नचिकेतनं आपल्या दमदार आवाजानं आणि उत्तम व्हॉईस मॉड्युलेशननं ही सगळी पात्र अक्षऱशः जिवंत केली आहेत. त्यामुळं नचिकेत देवस्थळी यांच्या भारदस्त आवाजात ‘सायको किलर’मधला थरार अनुभवणं ही श्रोत्यांसाठी खरंच मेजवानी ठरतीय.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | ‘महिला, महिला आणि भांडायला पहिला…’, सोनालीची तृप्ती देसाईंसोबत तूतू-मैमै!

Drugs Case | मुंबई आणि गोवा एनसीबीची संयुक्त कारवाई, अर्जुन रामपालचा मेहुणा अ‍ॅगिसिलोसला पुन्हा अटक!

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.