Marathi Movie : ‘आश्रय’ सिनेमाच्या टिमची माहेर संस्थेला भेट, ‘माहेर’वासीयांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य

'आश्रय' या चित्रपटाच्या टिमनं माहेर या संस्थेला मदतीचा हात पुढे करत मराठी सिनेसृष्टीसमोर एक आदर्श ठेवला आहे. माहेरवासीयांसोबतच संपूर्ण दिवस घालवत या चित्रपटाच्या टिमनं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Marathi Movie : 'आश्रय' सिनेमाच्या टिमची माहेर संस्थेला भेट, 'माहेर'वासीयांच्या चेहऱ्यावर फुलवलं हास्य
'आश्रय' सिनेमाच्या टिमची माहेर संस्थेला भेट
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 8:20 AM

मुंबई : बरेच चित्रपट मनोरंजनासोबतच सामाजिक जाणिवेचं भान राखत महत्त्वाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. काही चित्रपट मात्र केवळ इथवरच न थांबता कृतीच्या माध्यमातून समाजासमोर नवा उदाहरण सादर करतात. ‘अनुभवे आले अंगा, ते या जगा देत असो…’ या संत वचनानुसार काही सिनेमे केवळ बडबड न करता थेट पुढाकार घेऊन कामालाही लागतात. आगामी ‘आश्रय (Ashray) हा मराठी चित्रपट अशांपैकी एक आहे. ‘आश्रय’ या चित्रपटाच्या टिमनं माहेर (Maher) या संस्थेला मदतीचा हात पुढे करत मराठी सिनेसृष्टीसमोर एक आदर्श ठेवला आहे. माहेरवासीयांसोबतच संपूर्ण दिवस घालवत या चित्रपटाच्या टिमनं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत ‘आश्रय’ची निर्मिती अभिषेक संजय फडे यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक येथे वसलेल्या नावाच्या सामाजिक संस्थेला ‘आश्रय’ सिनेमाच्या टीमनं भेट दिली. १९९७ मध्ये सिस्टर ब्ल्यूसो कुरियन यांनी वढू बुद्रुक येथे ‘माहेर’ या समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना केली. आंतरधर्मीय आणि जातीमुक्त भारतीय संस्था असलेल्या माहेरनं आजवर विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य करत सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

सध्या जवळपास १२०० जीवांचं आश्रयस्थान बनलेल्या माहेरला ‘आश्रय’च्या टिमनं भेट देत त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. ‘आश्रय’च्या टिमनं माहेरला पंखे आणि कुकरच्या स्वरूपात भेटवस्तूही दिल्या. या प्रसंगी चित्रपटाच्या टिमनं माहेरमधील सदस्यांसोबत संपूर्ण दिवस घालवत त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि त्यांचं मनोरंजनही केलं. अनाथांना आश्रय देणाऱ्या माहेरभेटीचं औचित्य साधत ‘आश्रय’चं नवं पोस्टरही रिलीज करण्यात आलं. या कार्यक्रमाला माहेर संस्थेच्या वतीनं रमेश काशिनाथ चौधरी, विक्रम भुजबळ, प्रशांत गायकवाड, माया शेळके, तर ‘आश्रय’ सिनेमाच्या वतीनं निर्माते अभिषेक संजय फडे, गीतकार आणि गायिका आरती अभिषेक फडे आणि दिग्दर्शक संतोष साहेबराव कापसे पटकथा-संवाद दीक्षित सरवदे, कलाकार अमय बर्वे, श्वेता पगार तसेच गणेश सटाले इत्यादी उपस्थित होते.

प्रामुख्यानं मुलींच्या पालणपोषणाच्या बाबतीत अग्रेसर असणाऱ्या माहेरनं मुलींनी भीक मागू नये यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. मुलांना सांभाळण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांसाठी माहेर ही संस्था हक्काचं माहेरघर म्हणून नावारूपाला आली आहे. अशा मुलांच्या शालेय, स्वास्थ्य, ध्यानधारणा, कला, वैयक्तीक विकास इत्यादी बाबींकडं जातीनं लक्ष देतानाच त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही स्वीकारली आहे. स्त्रियांसाठी कार्यरत असणाऱ्या माहेरनं कौटुंबिक हिंसाचार, अविवाहित गर्भधारणा, विधवा, हुंडा यांचे बळी ठरलेल्या स्त्रियांनाही आश्रय देण्याचं मोठं काम आहे.

संबंधित बातम्या

Holi Festival Song : ‘रंग बरसे’ होळी स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रवी भाटिया आणि काव्या किरण यांचं नवं गाणं प्रदर्शित

Holi Festival 2022 : सोहेन खानची पर्यावरणपूरक होळी, मुलगा योहानसोबत खेळला पाण्याची होळी

Holi Festival : रंग बरसे… अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची लग्नानंतरची पहिली होळी, पाहा फोटो…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.