प्रेम आणि रहस्याचा रंजक खेळ ‘रौद्र’, 1 एप्रिलपासून चित्रपटगृहात

| Updated on: Mar 03, 2022 | 7:04 PM

एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित रौद्र हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

प्रेम आणि रहस्याचा रंजक खेळ ‘रौद्र’, 1 एप्रिलपासून चित्रपटगृहात
‘रौद्र’- सिनेमा
Follow us on

मुंबई : प्रत्येक गावाचा इतिहास असतो तसा माणसांचाही इतिहास असतो. या इतिहासाच्या गर्भात अनेक रहस्य दडलेली असतात. अशाच एका रहस्याचा शोध घेत असताना विविध भावभावनांचा खेळ रंगत जातो आणि त्यातून त्या रहस्याचं एक वेगळंच ‘रौद्र’ रूप समोर येतं. हे रूप नेमकं कोणाचं असणार? याची रंजक तेवढीच अकल्पित कथा म्हणजे ‘रौद्र( Raudra) हा मराठी चित्रपट. एम.जी पिक्चर्स निर्मित आणि रविंद्र शिवाजी लिखित-दिग्दर्शित रौद्र हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. राहुल पाटील (Rahul Patil) आणि उर्मिला जगताप (Urmila Jagtap) ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले (Deepak Damale), अनिता कोकणे (Anita Kokane), अमित पडवणकर (Amit Padvankar),ईशान गटकळ (Ishan Gatkal) या कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.

वडगांव… एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं गाव….1970 सालचा काळ…. त्रिंबक कुरणे नामक जनगणना अधिकारी जनगणनेच्या निमित्ताने वडगांवला येतो. त्रिंबकला इतिहासात रुची असते.नानासाहेब कुलकर्णीं हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. ते त्रिंबकची राहण्याची सोय त्यांच्या जुन्या वाड्यावर करतात. त्या वाड्याबद्धल चिक्कार अफवा असतात. वाडाही भव्य व भयानक असा असतो.काहीं दिवसात त्रिंबकला विचित्र व भयावह आवाज ऐकू येतात.नानासाहेबांकडे एक पुरातन बखर आहे ज्यात गावाबद्दल ऐतिहासिक माहिती आहे हे त्रिंबकला समजते. या बखरीतवेगवेगळी कोडी असतात ज्यामार्फत रहस्याचा उलगडा होणार असतो. नायिकेच्या मदतीने कोडयामधील महत्त्वाचा धागा त्याचा हाती लागतो. मात्रया शोधाला अचानक विश्वासघाताचं ग्रहण लागतं, तेव्हा होणारा विनाश आणि त्याचं ‘रौद्र’ रूप या चक्रात कोण आणि कसं अडकणार? हे पहाणं अतिशय औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे.या साऱ्याला एका अलवार प्रेमाच्यागोष्टीचीअनवट किनारही लाभली आहे.

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर,ईशान गटकळ या कलाकारांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.

‘अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.या कंपनीचे एमडी श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले, कि, ‘मराठी रसिक प्रेक्षक चोखंदळ आहे. वेगवेगळ्या पठडीतल्या चित्रपटांच्याआशय-विषयाला त्यांनी नेहमीच चांगली दाद दिली आहे. मराठी चित्रपट प्रादेशिक गंध घेऊन राष्ट्रीय-आतंरराष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवू लागला आहे. ‘रौद्र’ चित्रपटाची कथाउत्कंठावर्धक असून प्रेक्षकांना ती खिळवून ठेवेल आणि वेगळा अनुभव देईल”, असा विश्वास ते व्यक्त करतात.

संबंधित बातम्या

Bappi lahiri : बप्पी लाहिरी यांच्या अस्थींचं विसर्जन, नातेवाईकांना अश्रू अनावर

नेटकरी म्हणाले ‘तू तर उतावळी नवरी आणि गुडघ्याला बाशिंग’, मलायकाचं असं उत्तर, ट्रोलर दोनदा विचार करतील!

Jhund: ‘झुंड’च्या ट्रेलरमध्ये लक्ष वेधणारी ‘भावना भाभी’ आहे तरी कोण?