Nilu Phule Death Anniversary | एक असा खलनायक, जो एकही डॉयलॉग न बोलता, भय निर्माण करायचा
अभिनेते निळू फुले (Nilu Phule) मराठी चित्रपट तसेच बॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते होते. आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल काही खास माहिती जाणून घेऊया.
मुंबई : अभिनेते निळू फुले (Nilu Phule) मराठी चित्रपट तसेच बॉलिवूड चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेते होते. आज, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल काही खास माहिती जाणून घेऊया. रंगमंचाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे निळकंठ कृष्णाजी फुले निळू भाऊ फुले आजही प्रेक्ष्क्कांच्या मनात आहेत. सुरुवातीपासूनच ते एक सशक्त अभिनेता होते. निळू फुले यांनी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता, त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
निळू फुलेंनी पिंजरा (1972), सामना (1975), जैत रे जैत (1977), दोन बायका फजिती ऐका (1982), वो 7 दिन (1982), कुली (1983), मशाल (1984) आणि सारांश (1984) अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये दमदार काम केले.
खलनायक म्हणून गाजले!
निळू फुले आपल्या कारकिर्दीत खलनायकाच्या भूमिकांमध्ये प्रचंड गाजल्या. चित्रपटांमधील त्यांच्या ग्रे शेड भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. यादरम्यान त्यांना प्रेक्षकांची खूप पसंती दिली. जिथे एकीकडे त्या काळातील खलनायक किंचाळत संवादांद्वारे पडद्यावर आपली भीती व्यक्त करत असत, पण उलट निळू फुले यांच्या शांत इंत्रीनेच पडद्यावर भीती निर्माण व्हायची. पडद्यावरील त्यांची केवळ उपस्थिती त्यांचे संवाद बोलल्यासारखी भासायची. त्यांच्या क्षणिक संवादाने प्रेक्षकांची शरीरदेखील थरथर कापायला सुरुवात करत.
महिन्याचा पगारही करायचे दान!
वयाच्या 17 व्या वर्षी पुण्यातील सशस्त्र सैन्य वैद्यकीय महाविद्यालयात माळी म्हणून काम करणारे निळू फुले आपला महिन्याचा ऐंशी रुपये पगार राष्ट्रीय सेवा दलाला दान करायचे. 2009मधील ‘गोष्टी छोटी डोंगराएवढी’ या चित्रपटात निळू फुलेंनी उत्तम भूमिका साकारली होती. परंतु, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच वयाच्या 79व्या वर्षी त्यांचे निधन झाले. निळू फुले यांनी ‘सरंजामशाह’, ‘जमीनदार’, ‘नेते’ वगैरे बहुतेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांचा स्वभाव पूर्णपणे समाजसेवकासारखा होता. परंतु, ते पडद्यावर येताच मुले व स्त्रिया त्यांना खूप घाबरायचे. त्यांच्या अभिनयात एक वेगळीच जरब होती.
(Nilu Phule Death Anniversary know about actors life)
हेही वाचा :
रणवीर नाही तर ‘या’वर दीपिका पदुकोणचे सर्वात जास्त प्रेम, व्हिडीओ शेअर करत सांगितलं सिक्रेट…