‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

पावनखिंड (Pavankhind) चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने शेअर केली मजेशीर पोस्ट

'पुष्पा'पेक्षा जास्त प्रेम 'पावनखिंड'वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट
Pavankhind, pushpa
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 10:56 AM

ऐतिहासिक कथानकावर आधारित ‘पावनखिंड’ (Pawankhind) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. मराठमोळा पोशाख, नऊवारी साडी, फेटे, ढोल-ताशे आणि तुताऱ्यांच्या निनादात ‘पावनखिंड’चे शो पाहिले जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा सुरू असताना पुण्यातल्या (Pune) एका व्यक्तीची या चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ही मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही आठवड्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पहायला मिळाली. आता ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, असं आवाहन या पोस्टद्वारे करण्यात आलं आहे.

चिन्मय मांडलेकरने शेअर केली पोस्ट

चिन्मयने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की जोपर्यंत पावनखिंड चित्रपट हा थिएटरमध्ये सुरू असेल तोपर्यंत ग्राहकांना मिसळीवर डिस्काऊंट मिळेल. पावनखिंड हा चित्रपट पाहिल्याचे तिकिट घेऊन या आणि मिसळवर 20 टक्के डिस्काऊंट मिळवा, अशी ही ऑफर देण्यात आली आहे. ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणे हे मराठी माणसाचं कर्तव्य आहे, या ओळीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला असल्याचं कळतंय. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी 1.15 कोटी रुपये, शनिवारी 2.05 कोटी रुपये आणि रविवारी तीन कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे वीकेंडला जवळपास सहा कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. प्रेक्षकवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मल्टिप्लेक्समधीलही शो वाढवण्यात आले आहेत. रविवारी महाराष्ट्रात तब्बल 1900 शोज लावण्यात आले. सोमवारीसुद्धा शोजचा आकडा अबाधित राहिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.