Pawankhind: सुपरहिट ‘पावनखिंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते.

Pawankhind: सुपरहिट ‘पावनखिंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
PawankhindImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:05 AM

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांमधील महापराक्रमी आणि शूरवीर असा हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे (Bajiprabhu Deshpande). ‘तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!’ असं म्हणत आपल्या राजासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाही बाजीप्रभूंनी प्रतीक्षा करायला लावली. बांदल सेनेच्या साथीने बाजीप्रभूंनी घोडखिंडीत अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने ही घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड (Pawankhind) या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर (Pravah Picture) या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे.

रविवारी 19 जूनला दुपारी 1 वाजता प्रवाह पिक्चरवर हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘पावनखिंड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट आहे.

हे सुद्धा वाचा

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.