‘पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध काश्मीर फाईल्स? कुठे चाललोय आपण?’; विजू मानेंची मार्मिक पोस्ट

सिनेमा हा समाजाचा आरसा मानला जातो. मनोरंजनपासून गंभीर मुद्द्यांपर्यंत असंख्य विषयांवर मराठी आणि बॉलिवूडमध्ये चित्रपट बनले आहेत. यापैकी काही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काहींमधून ज्वलंत प्रश्न उपस्थित केले जातात.

'पावनखिंड विरुद्ध झुंड विरुद्ध काश्मीर फाईल्स? कुठे चाललोय आपण?'; विजू मानेंची मार्मिक पोस्ट
Pawankhind Jhund and The Kashmir FilesImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 9:57 AM

सिनेमा हा समाजाचा आरसा मानला जातो. मनोरंजनपासून गंभीर मुद्द्यांपर्यंत असंख्य विषयांवर मराठी आणि बॉलिवूडमध्ये चित्रपट बनले आहेत. यापैकी काही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काहींमधून ज्वलंत प्रश्न उपस्थित केले जातात. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे थोडीशी बॅकफूटवर गेलेली ही फिल्म इंडस्ट्री पुन्हा एकदा जोमाने उभी राहिली आहे. गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेले दमदार चित्रपट आणि त्यांना प्रेक्षकांकडून मिळालेला तुफान प्रतिसाद यांमुळे मनोरंजनविश्वाला नवचैतन्य मिळालंय. मात्र याच चित्रपटावरून काही वादही निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर त्याबद्दल चर्चा होऊ लागल्या आहेत. या चर्चांना काही अंशी जातपातीचाही रंग लागला आहे. याचवरून आता मराठी दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांनी फेसबुकवर मार्मिक पोस्ट लिहिली आहे. पावनखिंड (Pawankhind) विरुद्ध झुंड (Jhund) विरुद्ध द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files), ही कुठली विद्वेषाची लढाई लढत आहात, याने काय साध्य होणार आहे, असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला आहे.

विजू माने यांची पोस्ट

‘कुठे चाललो आहोत आपण ? सध्या जाती धर्माच्या भिंती आणखी मजबूत करण्याचं जे काम सुरु आहे ते पाहून हाच प्रश्न मनात येतो माझ्यासारख्याच्या. कुठे चाललो आहोत आपण ? पावनखिंड विरुध्द झुंड विरुध्द काश्मीर फाईल्स ? ही कुठली विद्वेषाची लढाई लढता आहात? काय साध्य होणार आहे ह्याने? मी स्वतःला उजवा डावा पुरोगामी वगैरे मानत नाही. मी माणूस म्हणून जगण्याला प्राधान्य देणारा आहे. एक सिनेमा बनतो त्यावर अम्मुक एका जातीचा शिक्का लावण्यापेक्षा सिनेमा म्हणून का पाहिलं जात नाहीय ? सिनेमा म्हणून जर आवडला नाही तर तो प्रत्येकाच्या आवडी निवडीचा भाग आहे असं समजून त्यांच्या मताचा आदर का केला जात नाही ? शोले न आवडणारी माणसं आहेतच कि, फक्त त्यांनी जय विरू आणि गब्बरची जात नव्हती पहिली. ‘मेरे देश कि धरती सोना उगले’ हे गाणं ऐकलं नाही तर तू देशभक्त नाहीस असा शिक्का नव्हता मारला. कुठून आलंय हे सगळं हे तुम्हालाही नीट कळत असेल. चीथावाणाऱ्या पोस्टचं प्रोफाईल अनेकदा लॉक असतं. त्यांच्या एखाद दोन पोस्ट visible असतात. अर्थात ती अस्तित्वातली व्यक्ती नसतेच. शेवटी आय टी सेल हा काही आता एका विशिष्ट पक्षाची मक्तेदारी राहिली नाही. जशास तसे उत्तर देणारे इकडेही होते आणि तिकडेही होते. आता मात्र पाणी डोक्यावरून गेलंय. विष पेरणारे इथेही आहेत आणि तिथेही, जे माझ्यामते अत्यंत भयानक आहे. रशिया युक्रेन युध्दाहून भयानक आहे. होय, ही अतिशयोक्ती नव्हे. घायाळ शरीरावरचे घाव भरतात, किंवा शरीर मृत होतं. घायाळ मनावरचे घाव चिरंतन राहतात, आणि ती जखम संसर्गजन्य बनवतात. जातीचा आणि धर्माचा अभिमान असायलाच हवा, तो दुराभिमान आणि द्वेष बनला की त्याचं विष बनतं. अमुक एका जातीत किंवा धर्मात जन्माला आलोय ह्यात माझं कर्तृत्व काय? आणि माझ्या जाती धर्माचा अभिमान बाळगताना इतर जाती धर्मांना तुच्छ् किंवा अन्यायकारी ठरवण्याचा अधिकार मला कोण देतं? आणि आजकाल हे सगळ्यांनाच लागू होतंय, सवर्ण किंवा असवर्ण. कुणी आरक्षणाच्या नावाने ठणाणा करतो तर कुणी पूर्वापार पिचलेल्या अवस्थेचं भांडवल करतोय. मागे कुठेतरी वाचलं होतं कलियुगाच्या अंताबद्दल. असं म्हणतात कली ज्यावेळी ब्रह्माला भेटायला गेला त्यावेळी त्याच्या एका हातात लिंग आणि एका हातात जीभ होती. ह्या दोन गोष्टींमुळे कलियुगाचा अंत होणार आहे. ही जरी रचित कथा मानली तरी कलीच्या हातात सोशल मीडिया का दिला नसेल असं वाटून गेलं. आजकाल सोशल मिडियावरचे गटतट पाहता. विश्वाचा अंत जवळ आलाय असंच वाटतं.

हे उद्विग्न शब्द काही समविचारी माणसांना ऐकवले. त्यांच्या चर्चेत असं ठरलं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी, आणि भारतीयत्व ह्यावर विश्वास असणाऱ्या माणसांचा सुध्दा एक गट (राजकीय पक्ष अथवा कुठलीही संघटना नव्हे.) असणं गरजेचं आहे. नाहीतर लयाला जाताना आपण केवळ बघ्याच्या भूमिकेत होतो ही बोच स्वस्थपणे मरूही देणार नाही. जे माझ्या विचाराशी सहमत असतील, त्यांनी अत्यंत विनयपूर्वक आपापल्या सोशल माध्यमातून जाती धर्माला फाटा देऊन, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी मूळ विषयांवर बोलत जाऊयात. तेही शक्य नसेल तर जाती धर्माच्या विखारी पोस्ट पासून स्वतःला आणि ज्यांची काळजी वाटते अशांना लांब ठेवूयात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले (ह्यात कुणाचंतरी नाव नाही म्हणून भांडू नका, त्या नावाचे विचार पसरवा) ह्यांना वाटून घेण्यापेक्षा ह्यांचे विचार वाटून घेऊयात. बदल शक्य आहे. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करतो.’

विजू माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘मी आहे तुझ्यासोबत आणि तू मांडलेल्या विचारांसोबत,’ असं अभिनेत्री हेमांगी कवीनं लिहिलं. तर ‘कटू सत्य सुंदर मांडलंय’ असं प्रवीण तरडेंनी म्हटलंय. अत्यंत महत्वाच आणि मनातलं आहे हे, असं समीर चौघुले म्हणाले. मृण्मयी देशपांडे, स्पृहा जोशी यांसारख्या कलाकारांनीही विजू मानेंच्या या पोस्टचं समर्थन केलं आहे.

हेही वाचा:

कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; “समाजात कसं वावरावं याचं भान..”

The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रींनी सेन्सॉर बोर्डावर असल्याचा घेतला फायदा? काय आहे सत्य?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.