Marathi actress | चेहऱ्यावर जखमा, या मराठी अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, पुणे हादरले
मराठी चित्रपटसृष्टीमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. आता कुटुंबियांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध आणि कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) हिच्या बहिणीविषयी अत्यंत मोठा बातमी पुढे येतंय. भाग्यश्री मोटे हिच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटे ही तुटलेली दिसली. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूची (Suspicious death) बातमी आल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीलाही मोठा धक्का बसलाय. आता पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केलाय. भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचे म्हटले आहे. मात्र, भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीच्या संशयास्पद मृत्यूमुळे पिंपरी चिंचवडसह पुणे (Pune) शहर हादरले आहे.
भाग्यश्री मोटे हिची बहीण पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे राहण्यास आहे. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचे नाव मधू मार्कंडे असे असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. केक तयार करण्याचा बिझनेस भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा असून या बिझनेसमध्ये तिची एक पार्टनर देखील आहे.
केक तयार करण्यासाठी त्यांना वाकड परिसरामध्ये एक रूम हवी होती. याच रूमच्या शोधात भाग्यश्री हिची बहीण मधू मार्कंडे ही घरातूनबाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत तिची मैत्रिण देखील होती. रूम शोधत असताना अचानक मधू मार्कंडे हिला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. यादरम्यान चक्कर आल्याने मधू ही थेट जमिनीवर कोसळली. मात्र, भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. यामुळे हा घातपात असल्याचेच सांगितले जातंय.
मधू मार्कंडे हिच्या मैत्रिनीने लगेचच दवाखान्यात नेले. मात्र, डाॅक्टरांनी उपचार होणार नसल्याचे सांगितले. मग मधू मार्कंडेच्या मैत्रीने थेट वायसीएम गाठले. याठिकाणी डाॅक्टरांनी भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीला तपासले असताना मधू मार्कंडेचा अगोदरच मृत्यू झाल्याचे सांगितले. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.
मधू मार्कंडेच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबियांनी मोठा आरोप करत हा मृत्यू नसून हा घातपात असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणातील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पुढे काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातंय. या प्रकरणात विविध चर्चा रंगताना देखील दिसत आहेत. मधू मार्कंडेच्या चेहऱ्यावर जखमा देखील आहेत.