‘प्रवीण दादा तू भारी आहेस, विषय कट’; ‘सरसेनापती हंबीरराव’ पाहून प्राजक्ता माळीचे आजी-आजोबाही झाले खूश!

प्रवीण तरडे मराठी सिनेसृष्टीतला मांजरेकरांनंतर बापमाणूस आहे खरोखर,' असं एकाने म्हटलंय. तर 'मी पण एकदा पाहिलाय अजून किमान दोनदा तरी पाहणार आहे प्रवीण दादासाठी,' असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

'प्रवीण दादा तू भारी आहेस, विषय कट'; 'सरसेनापती हंबीरराव' पाहून प्राजक्ता माळीचे आजी-आजोबाही झाले खूश!
Prajakta Mali's PostImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 2:53 PM

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची ही सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आणि त्यानंतर मिळालेला मोकळा वेळ तिने आजी-आजोबांसोबत घालवण्याचा निश्चय केला. आजी-आजोबांना घेऊन ती प्रवीण तरडेंच्या (Pravin Tarde) ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) हा चित्रपट पहायला गेली. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने थिएटरबाहेर असलेल्या मोठ्या पोस्टरसोबत फोटोदेखील काढला. हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट,’ असं तिने म्हटलंय. प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कमेंट्स करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘आजी-आजोबासोबत एक दिवस.. आणि आम्ही ‘सरसेनापती हंबीरराव’ पाहिला. कौतुकाला शब्द अपूरे पडतील, इतका अप्रतिम झालाय चित्रपट. प्रवीण दादा तू भारी आहेस- विषय कट. अडीच तासात तू दोन महाराजांची, त्यांच्या सरसेनापतीची, अंतर्गत राजकारणाची, स्वराज्याची गोष्ट ज्या हुशारीनं दाखवलीस त्याला तोडच नाही. तुझ्यातला प्रेमळ, समंजस, दूरदृष्टी असणारा गोड माणूस लेखनात उतरला आणि त्याने आम्हांला कितीतरी शिकवलं. त्यासाठी किती धन्यवाद देऊ? #केवळप्रेम महेश लिमये नेहमीप्रमाणे कडक कामगिरी. गश्मीर महाजनी, श्रुती मराठे मोहीम यशस्वी. प्रत्येक मराठी माणसानं बघितलाच पाहिजे असा हा चित्रपट. (मी पुन्हा किमान दोनदा तरी पाहणार आहे) आजी- आजोबा एकदम खूश,’ अशा शब्दांत प्राजक्ताने कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

प्रवीण तरडे मराठी सिनेसृष्टीतला मांजरेकरांनंतर बापमाणूस आहे खरोखर,’ असं एकाने म्हटलंय. तर ‘मी पण एकदा पाहिलाय अजून किमान दोनदा तरी पाहणार आहे प्रवीण दादासाठी,’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. ‘सरसेनापती जर आठवून पाहिले तर कदाचित तंतोतंत असेच असतील,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी कौतुक केलंय.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’मध्ये गश्मीर महाजनी, श्रुती मराठे यांच्याही भूमिका आहेत. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. या चित्रपटात हंबीररावांच्या नजरेतून मराठा साम्राज्य प्रेक्षकांच्या पहायला मिळणार आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.