Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा रिलेशनशिपविषयी मोठा खुलासा; म्हणाली “ब्रेकअप झालं तेव्हा..”
या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी बोलताना प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. वाय या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपदरम्यान शूटिंगचा अनुभव कसा होता, याबद्दल तिने सांगितलं.
अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या तिच्या ‘रानबाजार’ (Raanbaazar) वेब सीरिजमध्ये सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये तिने पहिल्यांदाच बोल्ड भूमिका साकारली आहे. या सीरिजनंतर आता तिचा ‘वाय’ (Y) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये तिने मुक्ता बर्वेसोबत काम केलंय. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान माध्यमांशी बोलताना प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. वाय या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपदरम्यान शूटिंगचा अनुभव कसा होता, याबद्दल तिने सांगितलं.
“वाय या चित्रपटात माझी खूप छोटी भूमिका आहे. पण ती तितकीच महत्त्वाची आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्या खासगी आयुष्यात खूप काही सुरू होतं. त्यावेळीच माझं ब्रेकअप झालं होतं. मी कुठे आहे, काय करतेय याची माझी मलाच कल्पना नसायची. किंबहुना शूटिंगदरम्यानच्या अनेक गोष्टी मला नीट आठवतही नाहीत. आम्ही जेव्हा चित्रपट पाहत होतो, तेव्हा मला दिग्दर्शक आठवण करून देत होते की तू हा सीन करताना पडली होती. हा सीन करताना तू अशा पद्धतीने बोललीस, तुला आठवतंय का? मी त्यांना फक्त हो असं म्हटलं होतं. पण मला त्यावेळी एकही गोष्ट आठवत नव्हती. मी माझ्याच विचारांमध्ये गुंतली होती”, असं तिने सांगितलं.
पहा ट्रेलर-
View this post on Instagram
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी जेव्हा वाय चित्रपट पाहिला तेव्हा फारच खूश होते. हा चित्रपट निवडून मी योग्य निर्णय घेतला याची मला खात्री पटली. चित्रपटाचा विषय खूपच छान आहे आणि तो पाहून तुम्हीसुद्धा विचारात पडाल. आपल्या महाराष्ट्रात आपल्या जवळच इतक्या गोष्टी घडतात, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळणार आहे. तो तुमच्यासाठी एक मोठा धक्का असेल.”
या चित्रपटात मुक्ता आणि प्राजक्ता माळीसोबत नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा नामवंत कलाकारांसोबत रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले यांच्याही भूमिका आहेत. येत्या 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘वाय’ या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. यात मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.