Darling : प्रथमेश परब आणि रितिकाचा ‘डार्लिंग’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार रिलीज

'डार्लिंग' हा चित्रपट घोषणा आणि मुहूर्तापासून सिनेसृष्टीसोबतच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी 'डार्लिंग'चं दिग्दर्शन केलं आहे. (Prathamesh Parab and Hrithika's 'Darling' will be released on 10th December)

Darling : प्रथमेश परब आणि रितिकाचा 'डार्लिंग' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' तारखेला होणार रिलीज
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 4:25 PM

मुंबई : पुन्हा एकदा सिनेमागृहांचे (Theaters) दरवाजे उघडणार असल्याची सुखद बातमी येताच हिंदीसह मराठीतील (Hindi-Marathi Movies) प्रोडक्शन हाऊसेसची खऱ्या अर्थानं लगीनघाई म्हणजेच आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एका मागोमाग एक घोषित केल्या जात आहेत. मराठीतील बहुचर्चित चित्रपट असलेल्या ‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही अनाऊन्स करण्यात आली आहे. 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेला ‘डार्लिंग’ 10 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘डार्लिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत

‘डार्लिंग’ हा चित्रपट घोषणा आणि मुहूर्तापासून सिनेसृष्टीसोबतच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी ‘डार्लिंग’चं दिग्दर्शन केलं आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचं आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं अर्थातच ‘डार्लिंग’कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. लॅाकडाऊनमुळं लांबणीवर गेलेल्या ‘डार्लिंग’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील ‘डार्लिंग तू…’ हे टायटल साँग असो वा, ‘ये है प्यार…’ हे रोमँटिक साँग असो… गीत-संगीताच्या माध्यमातूनही ‘डार्लिंग’नं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं कथानक या चित्रपटाचा खरा नायक आहे.

प्रथमेश परबची ऑनस्क्रीन नायकरूपी साथ

या कथानकाला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अशी ओळख असलेल्या प्रथमेश परबची ऑनस्क्रीन नायकरूपी साथ लाभली आहे. या चित्रपटात प्रथमेशची ‘टकाटक’मधली जोडीदार रितीका श्रोत्री त्याची ‘डार्लिंग’ बनली आहे. या निमित्तानं प्रथमेश-रितीका ही जोडी पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली असून, रसिकांना पुन्हा एकदा गाजलेल्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या दोघांना ‘लागीरं झालं जी’ आणि ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाणची सुरेख साथ लाभल्याचं चित्रपटात पहायला मिळेल. थोडक्यात काय तर मनोरंजनाचं परीपूर्ण पॅकेज असलेला ‘डार्लिंग’ अखेर रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांचंच

चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमात प्रथमेश-रितीका-निखिल यांच्या जोडीला मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. खरं तर हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली होती, पण लॅाकडाऊनच्या सावटानं घात केला. आता मात्र कोरोनाचे ढग दूर झाले आहेत. या चित्रपटाचे रिलिजिंग पार्टनर पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी असून, वितरणाची जबाबदारीही तेच सांभाळणार आहेत.

संबंधित बातम्या

आर्यनच्या अटकेमुळे आता शाहरुखच्या चित्रपटांना ग्रहण, ‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार?

‘Tujhi Mazi Yaari : मैत्रीवर भाष्य करणारी ‘तुझी माझी यारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेत्री स्नेहल साळुंके आणि मीरा जगन्नाथ मुख्य भूमिकेत

Kranti Redkar : चर्चा समीर वानखेडेंची चर्चा मग बायकोची का नको? क्रांतीचे फोटो पुन्हा व्हायरल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.