Timepass 3: ‘टाइमपास 3’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; 4 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) ‘टाइमपास 3'ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अवघ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजे दगडू आणि प्राजू. प्रेक्षकांनी ‘टाइमपास 1’ आणि ‘टाइमपास 2’ मधील दगडू आणि प्राजूच्या अनोख्या लव्हस्टोरीला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास 3’नेही (Timepass 3) प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाइमपास 3’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांमध्ये 4.36 कोटी रुपयांची कमाई करून धुमाकूळ घातला आहे. अजूनही बॉक्स ऑफिसवर (Box Office) ‘टाइमपास 3’ची यशस्वी घोडदौड सुरु आहे. सध्या पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.
झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी चित्रपटाविषयी म्हणतात, “या चित्रपटाने अवघ्या 4 दिवसांमध्ये 4.36 कोटी रुपयांची कमाई करून बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. सध्या हिंदी सिनेमाचा प्रेक्षकांवर पडलेला प्रभाव बघता दगडू आणि पालवीच्या प्रेमाला प्रेक्षकांचा इतक्या कमी दिवसांत इतका उत्साहजनक प्रतिसाद पाहून अभिमान वाटतो. चित्रपट चांगला असल्यावर प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट डोक्यावर घेतात, तसाच हा चित्रपट आहे. ज्याला सध्या प्रेक्षकांच्या उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘टाइमपास 1’ आणि ‘टाइमपास 2’ ला जितका प्रतिसाद मिळाला तितकाच प्रतिसाद प्रेक्षक ‘टाइमपास 3’लाही देत आहेत. चित्रपट पाहून समीक्षक आणि प्रेक्षकांच्या देखील सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.”
View this post on Instagram
2014 मध्ये ‘टाइमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाइमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय.