Timepass 3: ‘टाईमपास 3’ने ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये रोवला झेंडा; मिळाली सात नामांकनं

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ चित्रपटात ह्रता दुर्गुळे,प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले,संजय नार्वेकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

Timepass 3: 'टाईमपास 3'ने ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये रोवला झेंडा; मिळाली सात नामांकनं
Timepass 3: 'टाईमपास 3'ने ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये रोवला झेंडाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 9:46 AM

गेल्या काही दिवसांपासून ‘टाईमपास 3’ (Timepass 3) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींचा गल्ला जमवला आहे. दगडू आणि पालवीच्या (Hruta Durgule) प्रेमकहाणीने मराठी पडद्यावर वेगळीच रंगत आणली आहे. ‘आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ’, ‘हम गरीब हुए तो क्या हुआ’ या अनेक हिट संवादाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा चित्रपट म्हणजे ‘टाईमपास’. जेवढं प्रेम टाईमपासच्या पहिल्या दोन भागांना मिळालं, आता त्याहूनही जास्त प्रेम प्रेक्षक ‘टाईमपास 3’ ला देताना दिसत आहेत. ‘टाईमपास 3’च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यातच सोने पे सुहागा म्हणजे नुकतंच जाहीर झालेल्या ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये (Zee Talkies Comedy Awards) ‘टाईमपास 3’च्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता- प्रथमेश परब, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- ह्रता दुर्गुळे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रवी जाधव, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अन्विता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संजय नार्वेकर, सर्वोत्कृष्ट गायक अमितराज (कोल्डड्रिंक) यांना ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये नामांकनं प्राप्त झाली आहेत. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ चित्रपटात ह्रता दुर्गुळे,प्रथमेश परब, भाऊ कदम, वैभव मांगले,संजय नार्वेकर इत्यादी कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

2014 मध्ये ‘टाइमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाइमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाइमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय. रवी जाधव यांच्या दिग्दर्शनाने रंगलेल्या ‘टाइमपास 3’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या चार दिवसांमध्ये 4.36 कोटी रुपयांची कमाई करून धुमाकूळ घातला आहे. पालवीची डॅशिंग, लव्हेबल अदा, दगडूची जबरदस्त कॉमेडी आणि त्यात भर म्हणून दगडूची गँग प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.