‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’; प्रवीण तरडेंचा ‘सरसेनापती हंबीरराव’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका साकारत आहेत. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 'आता आपण फक्त दिवस मोजायचे' असं म्हणत प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली.

'आता आपण फक्त दिवस मोजायचे'; प्रवीण तरडेंचा 'सरसेनापती हंबीरराव' 'या' दिवशी होणार प्रदर्शित
Sarsenapati HambirraoImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 1:08 PM

‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत आज गेल्या वर्षी ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या जबरदस्त टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका साकारत आहेत. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. ‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’ असं म्हणत प्रवीण तरडेंनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. येत्या 27 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie)

प्रविण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकत बॉक्स ऑफिसवर यश संपादन केलं होतं. यामुळे त्यांचा पुढचा चित्रपट कोणता असेल याबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता होती. प्रवीण तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रवीण तरडेंनीच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मोठी मदत केली होती. या चित्रपटात हंबीररावांच्या नजरेतून मराठा साम्राज्य प्रेक्षकांच्या पहायला मिळणार आहे.

हेही वाचा:

‘द काश्मीर फाईल्स’च्या पल्लवी जोशी, विवेक अग्निहोत्रींविरोधात काढण्यात आला फतवा

बजेट कमी, मोजकं प्रमोशन करूनही ‘द काश्मीर फाईल्स’ची दणक्यात कमाई

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुपलं, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....