Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sarsenapati Hambirrao: जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; ‘सरसेनापती हंबीरराव’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर

प्रवीण तरडेंनीच (Pravin Tarde) चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Sarsenapati Hambirrao: जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखुनी खडा; 'सरसेनापती हंबीरराव'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
Sarsenapati HambirraoImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 12:03 PM

‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’, असं म्हणत गेल्या वर्षी ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या जबरदस्त टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान उलगडणार आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) हे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांची भूमिका साकारत आहेत. येत्या 27 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Marathi Movie)

हा मराठीतला बिग बजेट चित्रपट असेल, असं प्रवीण तरडेंनी म्हटलं होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ग्राफिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची झलक पहायला मिळते. प्रवीण तरडेंच्या पत्नीनेही यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील दमदार संवादही विशेष लक्ष वेधून घेतात. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची प्रतीक्षा प्रेक्षक करत आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बरेच अडथळे आले होते. त्यामुळे प्रदर्शनालाही विलंब झाला. मात्र अखेर हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

पहा टीझर-

प्रवीण तरडेंनीच चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. त्याचसोबत त्यांनी दिग्दर्शनाचीही जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मोठी मदत केली होती. या चित्रपटात हंबीररावांच्या नजरेतून मराठा साम्राज्य प्रेक्षकांच्या पहायला मिळणार आहे.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.