Premat Tujhya : अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीदची लव्हेबल केमिस्ट्री, ‘प्रेमात तुझ्या’ या गाण्यात झळकली जोडी

प्रेमी युगुलांमधील प्रेम हे हल्ली बऱ्याच गाण्यांमधून , चित्रपटांमधून आणि मालिकांमधून व्यक्त होताना आपण पाहतोच. सध्याची तरुण पिढी तर या प्रेम भावनेला अधिकच मापात तोलते आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाच प्रेम भावनेला व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीद 'प्रेमात तुझ्या' या प्रेमगीतातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. या दोघांची जोडगोळी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. (Premat Tujhya: Lovely chemistry between actress Sayali Chaudhary and actor Siddharth Khird, starring in the song 'Premat Tujhya')

Premat Tujhya : अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीदची लव्हेबल केमिस्ट्री, 'प्रेमात तुझ्या' या गाण्यात झळकली जोडी
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 8:16 AM

मुंबई : प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे की (Love Song), आणि त्याबद्दल कितीही लिहावे तितके थोडेच. प्रेमाची अभिव्यक्ती अनेक रूपांनी होताना आपण पाहतोच. समाजावरील, कुटुंबावरील आणि दोन व्यक्तींचे एकमेकांवरील प्रेम अनेक प्रकारांनी व्यक्त होत असते. प्रेयसी आणि प्रियकर यांचे प्रेम पाहता ही प्रेम भावना कधी संपू नयेच असे वाटते.

तरुण पिढी या प्रेम भावनेला अधिकच मापात तोलते!

प्रेमी युगुलांमधील प्रेम हे हल्ली बऱ्याच गाण्यांमधून , चित्रपटांमधून आणि मालिकांमधून व्यक्त होताना आपण पाहतोच. सध्याची तरुण पिढी तर या प्रेम भावनेला अधिकच मापात तोलते आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशाच प्रेम भावनेला व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीद ‘प्रेमात तुझ्या’ या प्रेमगीतातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. या दोघांची जोडगोळी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

पाहा गाणं

मालिकाविश्वात अभिनयाला प्रथम प्राधान्य देणारी सायली चौधरी मुख्य भूमिकेत

नाटक, मालिकाविश्वात अभिनयाला प्रथम प्राधान्य देणारी सायली चौधरी सर्वानीच पाहिली. ‘देवयानी’, ‘रुंजी’, ‘छत्रीवाली’, ‘सारे तुझ्याच साठी’ यासारख्या बऱ्याच मालिकांमधून तर गलतीसे मिस्टेक या नाटकातून आपला ठसा उमटवित अभिनयासह नृत्याची आवड जोपासत ती नव्याने ‘प्रेमात तुझ्या’ या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे.

गाण्यात थिरकताना दिसणार अभिनेता सिद्धार्थ खिरीद

सिद्धार्थ खिरीदसह ती या गाण्यात थिरकताना दिसणार आहे. दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात दिग्दर्शित हे गाणे असून या गाण्याचे नयनरम्य चित्रीकरण सागर आंबात यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. तर या गाण्याच्या संकलनाची जबाबदारीही सागर आणि सचिन यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. या गाण्याची कोरियोग्राफी हर्षद वाघमारे याने केली आहे. या गाण्याच्या संगीताची धुरा वरून लिखाते याने सांभाळली असून गाण्याचे बोल मंदार चोळकर लिखित असून श्रुती राणे हिने या गाण्याला आपल्या सुमधुर स्वरात संगीतबद्ध केले आहे.

संबंधित बातम्या

Shefali Jariwala : शेफाली जरीवालाने फ्लोरल बिकिनी परिधान करत केलं फोटोशूट, चाहते म्हणाले ‘एकदम कडक’

Navratri 2021 Special Song : ‘घनी कूल छोरी’ ते ‘रामो रामो’पर्यंत, नवरात्रीच्या प्लेलिस्टमध्ये आवर्जून सामील करा ‘ही’ गाणी!

OTT This Week : ‘रश्मि रॉकेट’ ते ‘घोस्ट्स’, पाहा या आठवड्यात ओटीटीवर काय काय रिलीज होणार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.