‘माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आणि निर्णय’, अभिनेत्री प्रिया बापटची पतीसाठी खास पोस्ट!
मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या जोडीनं रिलपासून ते रिअल लाईफपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
मुंबई : मराठी इंडस्ट्रीतील गोड आणि हटके कपल अशी ओळख असलेले अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) सध्या नवनवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्यांची मनं जिंकत आहेत. या जोडीनं रिलपासून ते रिअल लाईफपर्यंत प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. प्रचंड प्रतीक्षेनंतर आपल्या नुकतीच सर्वांची आवडती ऑफस्क्रीन जोडी प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र भेटण्यासाठी आली होती. ‘आणि काय हवं‘च्या (Ani Kay Hava) माध्यमातून जुई आणि साकेत बनून ते आपल्या भेटीला आले होते. ही जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करत असते.
नुकतच या दोघांच्या लग्नाला दशक पूर्ण झालंय. या खास निमित्ताने प्रिया बापट हिने लग्नातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दोघे एकमेकांसाठी खास उखाणा घेताना दिसत आहेत. या क्यूट रोमँटिक व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
नात्यातील नावीन्य टिकवण्यासाठी….
तुम्हाला असे कधी वाटते का, एक ‘कपल’ म्हणून तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात, तुमचे नाते परिपक्व आहे, एकमेकांना सांभाळून घेता, असा प्रश्न विचारला असता, उत्तर देताना ते म्हणाले की, वैवाहिक जीवनातील सुरुवातीचा काळ हा नेहमीच खास असतो. परंतु जशीजशी वर्षे सरतात, तसे या नात्यातील नावीन्य कमी होऊ लागते. दैनंदिन जीवन सुरु होते. आयुष्यात मजा अशी काही राहातच नाही आणि रटाळ, कंटाळवाणे आयुष्य सुरु होते. अशा वेळी नवरा बायकोच्या नात्यातील मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि या नात्यातील नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणे किती गरजेचे आहे, याची जाणीव होऊ लागते.
प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व काहीच दिवसांपूर्वी चाहत्यांच्या भेटीस आले आहे.
हेही वाचा :
Kranti Redkar : चर्चा समीर वानखेडेंची चर्चा मग बायकोची का नको? क्रांतीचे फोटो पुन्हा व्हायरल
Arvind Trivedi Died : लाडक्या ‘रावणा’ला निरोप देताना कलाकारही झाले भावूक, सोशल मीडियावर वाहिली श्रद्धांजली!#ArvindTrivedi | #Ravan | #Ramayana https://t.co/fEekA2Svqs
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021