Marathi Upcoming Film | पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीससह रितेश देशमुखही होणार ‘अदृश्य’!

| Updated on: Jul 20, 2021 | 1:14 PM

‘अदृश्य’ हा मराठी थ्रिलर चित्रपट असून, यात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग (Pushkar Jog), मंजिरी फडणीस (Manjiri Fadnis) आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुखसुद्धा (Riteish Deshmukh) झळकणार आहे .

Marathi Upcoming Film | पुष्कर जोग आणि मंजिरी फडणीससह रितेश देशमुखही होणार ‘अदृश्य’!
पुष्कर जोग, मंजिरी फडणीस आणि रितेश देशमुख
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल (Kabir Lal) यांनी आजपर्यंत ‘ताल’, ‘परदेस’, ‘कहो ना प्यार है’, ‘वेल कम बॅक’ इत्यादी सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वी पणे सांभाळली आहे आणि आता ते प्रथमच दिग्दर्शन करत असून, त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट ‘अदृश्य’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘अदृश्य’ हा मराठी थ्रिलर चित्रपट असून, यात प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग (Pushkar Jog), मंजिरी फडणीस (Manjiri Fadnis) आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुखसुद्धा (Riteish Deshmukh) झळकणार आहे .

विशेष गोष्ट म्हणजे कबीर लाल आणि रितेश देशमुख 20 वर्षानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. रितेश देशमुखचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’चे सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हेच होते. या विषयी सांगताना रितेश म्हणतो, ‘मी चित्रपटांत काम करतो याचे कारण कबीर लाल हेच आहेत. सुभाष घई यांच्या एका चित्रपटाच्या सेट वर शूटिंग बघायला मी गेलो होतो, त्यावेळेस माझी आणि कबीर लाल यांची भेट झाली. कदाचित त्यावेळीच त्यांना असे वाटले असेल कि, मला अभिनेता बनायचे आहे. पुढे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटासाठी त्यांनी माझे नाव सुचवले आणि त्याच चित्रपटाने माझ्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली.’

माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब : रितेश देशमुख

रितेश पुढे म्हणतो, 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा कबीर लाल यांच्या सोबत काम करतांना मला खूप छान वाटतं आहे आणि ते एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत आणि त्याचा मी महत्त्वपूर्ण भाग आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री मंजरी फडणीस यांच्यासह सौरभ गोखले, अनंत जोग, अजय कुमार सिंह हे अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे, लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे. चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

(Pushakar Jog, Manjiri Fadnis and Riteish Deshmukh ‘s Upcoming Marathi Film Adrushya)

हेही वाचा :

अभिनेत्रीच नव्हे कवयित्री देखील! प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला

‘भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का?’ अजाणावर भाष्य करणाऱ्या ‘भोंगा’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस!