राजकारणातून थेट चित्रपटात! रामदास आठवले आणि राजू शेट्टींच्या जोडी झळकरणार मराठी सिनेमात

राजू शेट्टी हे तुम्हाला एका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत नुसते राजू शेट्टीच नाही तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील चित्रपटात दिसून येणार आहेत. आता राजू शेट्टी आणि रामदास आठवले ही जोडी एका चित्रपटात दिसते म्हटल्यानंतर या चित्रपटाची खास उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. हे तगडी स्टारकास्ट बघायला प्रेक्षकांचे थेटरकडे लक्ष लागेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

राजकारणातून थेट चित्रपटात! रामदास आठवले आणि राजू शेट्टींच्या जोडी झळकरणार मराठी सिनेमात
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 11:30 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athawale ) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी(Raju Shetty ) दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध नावं. शीघ्र कवी अशीही रामदास आठवलेंची ओळख तर शेतकरी आंदोलन म्हंटल की राजू शेट्टींच नाव डोळ्यासमोर येत. महाराष्ट्राच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांनी राजकारणात आपली एक वेगळी छाप पाडली आहे. आत हे दोघेही राजकारणातून थेट चित्रपटात एन्ट्री करणार आहेत. रामदास आठवले आणि राजू शेट्टींची जोडीच्या अभियनाची झलक मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘राष्ट्र – एक रणभूमी'(Rashtra Ek Ranbhoomi) या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही अभियन क्षेत्रातही दिसणार आहेत. या चित्रपटात दोघांची विशेष भूमिका पहायला मिळणार आहे.

शीघ्र कवी अशी रामदास आठवलेंची ओळख

आज पर्यंत आठवलेंचे राजकीय करिअर पाहिल्यास त्यांची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे त्यांच्या शीघ्र कविता. त्यांच्या कवितांवरती तुम्ही अनेकदा फिदा झाला असाल. सध्या रामदास आठवले हे भाजपसोबत सत्तेत बसलेला असून त्या काँग्रेसवर वेळोवेळी तोफा डागत असतात तसेच आपल्या कवितांमधून विरोधकांना घायाळ करत असतात त्यांच्या कविता विरोधकांसाठी बोचरे बाण असतात.

शेतकऱ्यांचा नेता दिसणार चित्रपटात

कोल्हापूरचे माजी खासदार राजू शेट्टी यांना आज पर्यंत तुम्ही अनेक शेतकरी आंदोलनात पाहिला असेल. रस्त्यावरचे आंदोलन ते संसदेपर्यंत गोंधळ असं राजू शेट्टींचं राजकीय करियर राहिलेलं आहे. ते अनेक अनेक वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतात मात्र राजू शेट्टी एका वेगळ्याच भूमिकेत दिसून येणार आहेत.

रामदास आठवले आणि राजू शेट्टी एका चित्रपटात पाहायला मिळणार

राजू शेट्टी हे तुम्हाला एका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत नुसते राजू शेट्टीच नाही तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील चित्रपटात दिसून येणार आहेत. आता राजू शेट्टी आणि रामदास आठवले ही जोडी एका चित्रपटात दिसते म्हटल्यानंतर या चित्रपटाची खास उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. हे तगडी स्टारकास्ट बघायला प्रेक्षकांचे थेटरकडे लक्ष लागेल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.

रामदास आठवले आणि राजू शेट्टींसह चित्रपटात दिसणार दिग्गज कलाकार

या चित्रपटात फक्त राजू शेट्टी आणि रामदास आठवले नाहीत तर नामवंत कलाकार आहेत. त्यात विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, संजय नार्वेकर, गणेश यादव, रीमा लागू सारख्या बड्या कलाकारांची मोठी फौज आहे. त्यामुळे हा चित्रपट तर जबरदस्त असणारा यात शंका नाही.

26 ऑगस्टला प्रदर्शित होणार ‘राष्ट्र – एक रणभूमी’ हा चित्रपट

‘राष्ट्र – एक रणभूमी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. महामारीमुळे लांबणीवर गेलेला महत्त्वपूर्ण विषय आता या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेला आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेले हे 26 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.