‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ कसं सूचलं?; वाचा रंजक किस्सा!
'येऊ कशी कशी मी नांदायला' आणि 'जवा नवीन पोपट हा...' ही गाणी कशी तयार झाली? गायक विठ्ठल शिंदे यांनी या गाण्यांना चाली कशा दिल्या? याचा रंजक किस्सा आपण वाचलाच आहे. (Read how mazya angala halad lava original song was made)
मुंबई: ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ आणि ‘जवा नवीन पोपट हा…’ ही गाणी कशी तयार झाली? गायक विठ्ठल शिंदे यांनी या गाण्यांना चाली कशा दिल्या? याचा रंजक किस्सा आपण वाचलाच आहे. ‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ लग्नात हमखास वाजणाऱ्या या लग्नगीताचा किस्साही तसाच रंजक आहे. सहज सूचलेल्या या गाण्याचा किस्सा वाचाच… (Read how mazya angala halad lava original song was made)
भीम जयंतीच्या कार्यक्रमाला गेले अन्…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रात दरवर्षी जल्लोषता जयंती साजरी केली जाते. औरंगाबादलाही भीम जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. जयंती निमित्त गायक विठ्ठल शिंदे यांच्या गाण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. शिंदे यांचा कार्यक्रम सुरू झाला होता. लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. भर वस्तीतच हा कार्यक्रम होता. स्टेजच्या बाजूलाच असलेल्या एका घरी लग्न होतं. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना शिंदे हा हळदीचा कार्यक्रम पाहात होते. तिथंच त्यांना ‘उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद लावा…’ या ओळी सूचल्या आणि पुढच्या ओळीही भरभर सूचत गेल्या आणि गाणं तयार झालं. आजही हे गाणं प्रत्येक लग्नात हमखास वाजतंच. ‘अहो राया माझी इच्छा करा पुरी…’ हे गाणंही शिंदे यांनी लिहिलं आहे.
रोशन सातारकर ते पुष्पा पागधरे… अनेकांना घडवलं
विठ्ठल शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गायकांना घडवलं. त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी रोशनबाई सातारकर, गुलाबबाई संगमनेरकर, लता टिपटाळेकर, हौसा मंजुळा, पुष्पा पागधरे आणि राजकिशोर शिंदे यांना विनामूल्य गायनाची तालीम दिली. त्याशिवाय झोपडपट्टीतील मुलांना विनामूल्य संगीताचे शिक्षण दिलं. झोपडपट्टीतील मुलांना विनामूल्य संगीत शिक्षण देत असताना विठ्ठल शिंदे यांना व्ही. के. इंजे मास्तर आणि सी. एल. झेमसेंसह अनेकांनी मदत केली.
राष्ट्रीय-राज्य पुरस्कार न मिळाल्याचं शल्य
शिंदे यांना अनेक पुरस्कार मान सन्मान मिळाले. त्यांना दलित मित्र पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. महापौर पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. परंतु, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचा एकही पुरस्कार न मिळाल्याचं शल्य त्यांना कायम बोचत होतं. माझ्या शिष्यांना राज्य सरकारने कला, सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित केलं. पण मला एकही पुरस्कार दिला नाही, असं ते म्हणायचे.
शेवटची इच्छा अपूर्ण
शिंदे यांना गरीब आणि झोपडपट्टीतील मुलांना संगीताचे शिक्षण देण्याची आवड होती. त्यानुसार त्यांनी काही काळ या मुलांना विनामूल्य संगीत शिक्षणही दिलं. परंतु, संगीत शिक्षण देण्यासाठीची जागा फिक्स नसल्याने या उपक्रमात व्यत्यय येत होता. त्यांना मुलांना संगीत शिक्षण देता येत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या डोक्यात संगीत विद्यालय सुरू करण्याची कल्पना आली. त्यासाठी सरकारने भूखंड द्यावा, अशी त्यांची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा अखेरपर्यंत पूर्ण झाली नाही. (साभार, आंबेडकरी कलावंत) (Read how mazya angala halad lava original song was made)
संबंधित बातम्या:
विठ्ठल शिंदेंना साक्षात बाबासाहेब आंबेडकरांची शाबासकी, काय म्हणाले बाबासाहेब?; वाचा, किस्सा!
लतादीदींनी गाणं थांबवलं, धीर दिला अन्…; वाचा, गायक विठ्ठल शिंदेंनी सांगितलेला किस्सा!
वाचता येत नव्हतं, तरीही ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ गायल्या; रोशन सातारकरांचा हा किस्सा माहीत आहे का?
(Read how mazya angala halad lava original song was made)