AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ या गाण्यात खट्याळपणा येत नव्हता; मग काय झालं?, वाचा!

लोकगीतांवर हुकूमत असलेले गीतकार मानवेल गायकवाड यांनी केवळ शब्दांचा खेळ केला नाही. (read story of 'Geli Majhi Sakkhi Bayko Geli' song)

'गेली माझी सख्खी बायको गेली...' या गाण्यात खट्याळपणा येत नव्हता; मग काय झालं?, वाचा!
manvel gaikwad
| Updated on: Mar 27, 2021 | 6:14 PM
Share

मुंबई: लोकगीतांवर हुकूमत असलेले गीतकार मानवेल गायकवाड यांनी केवळ शब्दांचा खेळ केला नाही. तर प्रत्येक गाण्यात गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गाण्यात प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांच्या गाण्याचा गोडवा आजही टिकून आहे. आजही त्यांची गाणी लोकांना आपली वाटतात… (read story of ‘Geli Majhi Sakkhi Bayko Geli’ song)

असं सूचलं ‘गेली माझी सख्खी बायको गेली’

‘गेली माझी सख्खी बायको गेली…’ हे मानवेल गायकवाड यांचं असंच गाजलेलं अप्रितम गीत आहे. या गाण्यातूनही एक प्रसंग उभा केला आहे. घरात मृत्यू झाल्यानंतर होणारी रडारड… मृत व्यक्तीचं गुणगान गात रडणाऱ्या बायका हे आपण नेहमी पाहतो. मानवेल गायकवाडांनीही हे प्रसंग पाहिले. पण एकदा असाच एक प्रसंग पाहिल्यानंतर त्यांना गाणं सूचलं. पण हे गाणं लिहिताना त्यांनी त्यात गंमत आणली. खट्याळपणा आणला. विनोदी ढंगाने लिहिलेलं त्यांचं हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं.

फिल आला नाही, स्वत: गायलं

मानवेल गायकवाड यांनी हे गाणं लिहिल्यानंतर गायक सूर्यकांत शिंदे आणि गायिका शकुंतला जाधव यांना घेऊन हे गाणं रेकॉर्ड केलं. पण या गाण्यात जो फिल हवा होता, तो येत नव्हता. अनेक प्रयत्न केल्यानंतरही गाण्यात जो खट्याळपणा हवा तो येत नसल्याने अखेर शकुंतला जाधव यांनीच मानवेल गायकवाड यांना हे गाणं गायला सांगितलं. त्यामुळे गायकवाड यांनी हे गाणं गायलं. हवा तो गाण्यात फिल आला. भट्टीही चांगली जमली. त्यामुळे शकुंतला जाधव यांनी गायकवाड यांच्यात आवाजात हे गाणं ठेवायला सांगितलं. नंतर हे गाणं पब्लिकने प्रचंड डोक्यावर घेतलं. आजही हे गाणं खेड्यापाड्यात हमखास वाजतच. विशेष म्हणजे हे गाणं त्यांनी स्वत: लिहिलं, गायलं आणि संगीतही त्यांनीच दिलं आहे.

ख्रिस्ती भजने ते लोकगीते

गायकवाड हे गायन क्षेत्राकडे वळण्याचा प्रवास अत्यंत रंजक आहे. गायकवाड कुटुंब नगरचं. त्यांचे मामा मायकेल जगताप ख्रिस्ती भजनं म्हणायचे. त्यामुळे गायकवाड यांच्यावरही ख्रिस्ती भजनांचा प्रभाव पडला होता. त्याकाळात त्यांनी ख्रिस्ती भजनेही लिहिली होती. मात्र, स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. प्रल्हादादांचं यांचे मायकल जगताप यांच्या घरी येणं-जाणं होतं. एकदा प्रल्हाददादांचा नगरमध्ये सामना होता. त्यामुळे ते जगताप यांच्याकडे आले होते. त्यांना सामन्यासाठी हार्मोनियम वादकाची गरज होती. त्यांनी जगताप यांना त्यांची अडचण सांगितली. त्यावर जगताप यांनी गायकवाडांकडे बोट दाखवलं आणि हा माझा भाचा मानवेल. याला घेऊन जा, असं म्हणाले. पण या लहानग्या पोराला हार्मोनियम वाजवता येईल का? असा प्रश्न प्रल्हाददादांना पडला. त्यांनी गायकवाड यांना हार्मोनियम वाजवायला सांगितलं. गायकवाड यांचं हार्मोनियम वादन पाहून ते जाम खूश झाले आणि पुढे ते प्रल्हाददादांच्या गायन पार्टीचे अविभाज्य अंग झाले. त्याकाळी त्यांना 2 ते 3 रुपये बिदागीही मिळत होती. विशेष म्हणजे या निमित्ताने आंबेडकरी गीते आणि लोकगीतांशी त्यांचा संबध आला आणि पुढे ते लोकगीतांचे बादशहाही झाले.

आनंद शिंदेंचे गीतकार

1975मध्ये ते गायक नवनीत खरेंकडे हार्मोनियम वादक म्हणून होते. तर गायिका रंजना शिंदे यांच्या गायन पार्टीत कोरस म्हणून काम करायचे. स्ट्रगलर म्हणून त्यांची धडपड सुरूच होती. 1982-83मध्ये आनंद शिंदे यांनी स्वत:ची गायन पार्टी काढली. त्यानंतर त्यांनी आनंद शिंदेंना गाणी पुरवण्यास सुरुवात केली. आनंद यांनीही त्यांच्या लेटरहेडवर त्यांचे गीतकार म्हणून मानवेल गायकवाडांचं नाव टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे गायकवाडांना स्वत:ची गायन पार्टी बंद करावी लागली. त्या आधी ते गाण्याचे स्वतंत्र कार्यक्रम करायचे. मधुकर घुसळे, विनायक पाठारे आणि रमेश वाकचौरेंची गाणी गायचे. गायिका वैशाली शिंदे, सुषमादेवी, चंद्रभागा गायकवाड आणि निशा भगत आदी गायिकांबरोबर त्यांचे गाण्यांचे सामने झाले आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (read story of ‘Geli Majhi Sakkhi Bayko Geli’ song)

संबंधित बातम्या:

आंटीच्या अड्डयावर रेड पडली अन् ‘आंटीची घंटी’ सूचलं; वाचा, नादावणाऱ्या गाण्याचा किस्सा

‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो’, साहेबांच्या टोमण्यांमुळे नोकरीच सोडली; वाचा, ‘या’ गायकाचा किस्सा!

सोनू निगमला कोणत्या मराठी गायकाने पहिला ब्रेक दिला माहीत आहे का?; वाचा, न ऐकलेला किस्सा (read story of ‘Geli Majhi Sakkhi Bayko Geli’ song)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.