Rinku Rajguru | चांगभलं रं देवा! ज्योतिबाच्या दर्शनासाठी रिंकू राजगुरू कोल्हापूरमध्ये, खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने

रिंकू राजगुरू हिने सैराट चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये पहिले पाऊल ठेवले. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू हिने अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहेत. रिंकू राजगुरू हिचा आज चाहता वर्गही मोठा आहे. रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Rinku Rajguru | चांगभलं रं देवा! ज्योतिबाच्या दर्शनासाठी रिंकू राजगुरू कोल्हापूरमध्ये, खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 10:04 PM

मुंबई : सैराट या चित्रपटातून रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला खरी ओळख मिळालीये. सैराट हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला. आज या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात. आर्ची आणि प्रश्या यांना प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले आणि ही जोडी हिट ठरली. काही वर्षांपूर्वी एक चर्चा सातत्याने रंगत होती, ती म्हणजे लवकरच सैराट 2 (Sairat 2) हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बातमीनंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. मात्र, अजून सैराट 2 ची घोषणा किंवा वेगळे असे काही अपडेट आले नाही. आजही प्रेक्षकांना सैराट चित्रपट (Movie) बघायला आवडतो.

सैराट चित्रपटाच्या स्टोरीवरच हिंदीमध्ये चित्रपट तयार करण्यात आला. विशेष म्हणजे श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर हिने याच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, मराठीमध्ये सैराट चित्रपटाने जो धमाका केला तो धमाका हिंदीमध्ये करता आला नाही. या चित्रपटासाठी जान्हवी कपूर हिने चांगलीच मेहनत घेतली होती. मात्र, या चित्रपटाला जलवा दाखवण्यात यश मिळाले नाही.

आपल्या सर्वांची आवडती आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिने सैराट चित्रपटाच्या माध्यमातून अगदी कमी वयामध्ये अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. रिंकू राजगुरू हिने सैराट चित्रपटानंतर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे रिंकू राजगुरू ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो आणि व्हिडीओ ती कायमच शेअर करताना दिसते.

नुकताच रिंकू राजगुरू हिने एक अत्यंत खास व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला. आता हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे रिंकू राजगुरू हिचा हा व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडत असून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट देखील केल्या आहेत. रिंकू राजगुरू हिचा हा व्हिडीओ कोल्हापूरमधील आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिंकू राजगुरू हिने ज्योतिबाचे दर्शन घेतले आहे.

विशेष म्हणजे रिंकू राजगुरू हिने चांगभलं असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केलाय. रिंकू राजगुरू ही तिच्या कुटुंबियांसोबत ज्योतिबाच्या दर्शनासाठी पोहचली. या व्हिडीओमध्ये चांगभलं रं देवा हे गाणे देखील ऐकू येत आहे. ज्योतिबासमोर मनोभावे हात जोडून रिंकू राजगुरू ही प्रार्थना करताना दिसत आहे. आता रिंकू राजगुरू हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.