‘थिएटरमध्ये जाऊन पावनखिंड पाहणारे…’; रितेश देशमुखचं ट्विट चर्चेत

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'पावनखिंड' (Pawankhind) हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त'नंतर शिवराज अष्टकातील या तिसऱ्या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

'थिएटरमध्ये जाऊन पावनखिंड पाहणारे...'; रितेश देशमुखचं ट्विट चर्चेत
Riteish Deshmukh tweet for PavankhindImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 10:21 AM

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’नंतर शिवराज अष्टकातील या तिसऱ्या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने नुकतेच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे जाहीर केले. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून ‘पावनखिंड’ने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटावर सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत असताना अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) केलेलं एक ट्विट चर्चेत आलं आहे. ‘पावनखिंड’च्या टीमला शुभेच्छा देत असतानाच रितेशने प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात दाखल झाला. या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पहिल्या वीकेंडला दणक्यात कमाई केली. (Pawankhind Box Office Collection)

रितेश देशमुखचं ट्विट- ‘हे अविश्वसनीय आहे. पावनखिंडच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांचे खूप खूप आभार’, असं रितेशने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्याचसोबत त्याने चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने शेअर केलेला ‘पावनखिंड’च्या कमाईचा आकडासुद्धा पोस्ट केला आहे. रितेशच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना काही नेटकऱ्यांनी ‘पावनखिंड’ हा चित्रपट हिंदीतही प्रेक्षकांच्या भेटीला आणा, अशी मागणी केली.

पावनखिंडची कमाई- ‘पावनखिंड’ने पहिल्या आठवड्यात 12.17 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या वीकेंडला इतर मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही ‘पावनखिंड’ने दणक्यात कमाई केली. दुसऱ्या वीकेंडमध्ये शुक्रवारी 1.02 कोटी रुपये, शनिवारी 1.55 कोटी रुपये तर रविवारी 1.97 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पहिला आठवडा आणि दुसरा वीकेंड मिळून आतापर्यंत या चित्रपटाने 16.71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’ची यशस्वी घोडदौड; वीकेंडला कमावले तब्बल इतके कोटी रुपये

संबंधित बातम्या: ‘पावनखिंड’चा अनोखा विक्रम; चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

संबंधित बातम्या: ‘पुष्पा’पेक्षा जास्त प्रेम ‘पावनखिंड’वर करणं हे मराठी माणसाचं कर्तव्य; चित्रपट पाहणाऱ्यांना मिसळवर डिस्काऊंट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.