आयेशा सय्यद, मुंबई : जगात काहीही घडत असेल तरी महाराष्ट्रातील लोक आपला त्याच्याशी असलेला संबंध शोधून काढतातच.असाच महाराष्ट्रातील एका फोनचा संबंध थेट रशियाशी जोडलेला आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. सगळीकडे या युद्धाबाबत जगात सध्या सगळीकडे या युद्धाबाबात बोललं जात आहे. पण महाराष्ट्रात सध्या एका व्हीडिओची चर्चा आहे. विनोदाचे बादशाह निळू फुले (Nilu Phule) आणि हास्यसम्राट अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा गल्ली ते दिल्ली या सिनेमातील एक व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. या व्हीडिओत निळू फुलेंनी थेट रशियाला फोन केलाय आणि त्यांना झापझाप झापलंय. हा व्हीडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला पहायला मिळतोय. अनेकांच्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ पहायला मिळतोय. इतकंच नव्हे तर राजकीय नेत्यांनाही या व्हीडिओने भूरळ घातलीये.
व्हायरल व्हीडिओत नेमकं काय आहे?
गल्ली ते दिल्ली या सिनेमातील एक कॉमेडी व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हीडिओत अशोक सराफ आणि निळू फुले यांची धम्माल कॉमेडी बघायला मिळतेय. अशोक सराफ यांनी निळू फुले यांना एक एक फोन लावून दिला.त्या फोनवर निळू फुले वेगळ्याच भाषेत बोलताना दिसतात. अशोक सराफ बाहेर येतात आणि बसलेल्या लोकांना सांगतात की “साहेबांनी रशियाला फोन केलाय आणि अफगाणिस्तानात सैन्य घुसवल्याबद्दल साहेब रशियाला दम देत आहेत”, असं म्हणतात.
गल्ली ते दिल्ली व्हायरल व्हीडिओ
या व्हीडिओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातलाय.अनेकांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला पहायला मिळतोय. अनेकांच्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ पहायला मिळतोय.
राजकीय नेत्यांना भूरळ
राजकीय नेत्यांनाही या व्हीडिओने भूरळ घातलीये. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही त्यांच्या फेसबुकला हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओला त्यांनी “विश्वगुरुंचा राग लै डेंजर”, असं कॅप्शन दिलं आहे.
संबंधित बातम्या