ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!

सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाड याची खेळी पाहून चाहत्यांना मात्र मराठी अभिनेत्रीची आठवण आली. ही मराठमोळी अभिनेत्री आहे सायली संजीव.

ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!
Sayali-Ruturaj
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 1:22 PM

मुंबई : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला. या सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाड याची खेळी पाहून चाहत्यांना मात्र मराठी अभिनेत्रीची आठवण आली. ही मराठमोळी अभिनेत्री आहे सायली संजीव.

चेन्नईने ठेवलेल्या 193 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी दमदार सुरुवात केली खरी पण 91 धावांवर अय्यरची विकेट पडली आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली आणि त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ज्यानंतर सामना चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर 27 धावांनी जिंकला.

खेळी ऋतुराजची चर्चा सायलीची!

ऑन फील्ड भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या ऋतुराजची ऑफ फील्ड विकेट गेल्याचं दिसतंय. मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) हिच्या फोटोवरील ऋतुराजची कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. अभिनेत्री सायली संजीवने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोवर ऋतुराजने ‘Woahh?♥️’ (वोआह) अशी कमेंट केली होती. या कमेंटला प्रतिसाद देत सायलीने हार्टचा ईमोजी शेअर केला होता. ही कमेंट वाचून दोघांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला. कोणी म्हणालं, यांचं जमतंय बहुतेक, तर कोणी सायली रिलेशनशीपमध्ये आहे भाऊ, असं म्हणत ऋतुराजची विकेट घेण्याचा प्रयत्न केला.

ऋतुराजच्या दमदार खेळीने चाहते देखील खूप झाले होते. यावेळी त्यांना सायलीची आठवण आली. शुक्रवारी दसऱ्याच्या निमित्ताने सायलीने शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट टाकली होती. तिची या पोस्टवर मात्र चाहत्यांनी ऋतुराजच्या खेळाबद्दलच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी चक्क तिला तूं यावेळी दुबईत असायला हवी होतीस, असं म्हटलं आहे.

कोण आहे सायली संजीव?

सायलीबद्दल बोलायचे तर तिने 2016 मध्ये चित्रपट आणि टीव्ही शोच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे ती खूप लोकप्रिय झाली. तेव्हापासून ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. सायलीने 2014मध्ये सुशांत शेलारसोबत एका म्युझिक व्हिडीओतही काम केले होते. सायलीने ‘9XM झकास’च्या ‘टॉप टेन नायिका’ स्पर्धेतही भाग घेतला होता.

सायलीने महाविद्यालयीन जीवनापासून अभिनयाला सुरुवात केली होती. तिने नाशिकमधील महाविद्यालयीन कार्यक्रमात पहिल्यांदाच अभिनय केला होता. याच महाविद्यालयातून तिने पॉलिटिक्समध्ये बी.ए. देखील केले आहे. सध्या सायली कलर्स मराठीवर ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत दिसली होती. आटपाडी नाईट्स सिनेमातील तिची भूमिकाही गाजली होती.

तर ऋतुराज गायकवाडबद्दल बोलायचे, तर त्याने महाराष्ट्रातही डोमेस्टिक क्रिकेट देखील खेळले आहे. ऋतुराज जितका मैदानावरील कामगिरीसाठी गाजतो, तितकाच तो आपल्या स्टाईल आणि लूक्ससाठीही प्रसिद्ध आहे. याआधी ऋतुराजच्या फोटोवरही सायलीने कमेंट केली होती. त्यामुळे दोघांमध्ये आंखो ही आंखोमें बरंच काही होताना दिसतंय.

हेही वाचा :

Prachi Singh : टीम इंडियाचा कोणता फलंदाज करतोय प्राची सिंहला डेट?; सोशल मीडियात चर्चांना उधाण!

प्रेक्षकांना आवडलाय विकी कौशलचा ‘सरदार उधम’, सोशल मीडियावर चाहते करतायत कौतुकाचा वर्षाव!

राज कुंद्राच नाही तर शिल्पा शेट्टीवरही लावले गंभीर आरोप, शर्लिन चोप्राने दाखल केला FIR!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.