Dharmaveer: ‘पश्या बघ काय कमावलंयस तू’, ‘धर्मवीर’चं कौतुक करताना अभिनेत्याच्या आईच्या डोळ्यात पाणी

बायोपिकमधील मुख्य भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतं. त्या व्यक्तीच्या प्रतिमेला कुठलाही धक्का न लावता, अभिनयात कुठलाही कृत्रिमपणा न आणता पडद्यावर फक्त ती व्यक्ती साकारणं हे म्हणावं तसं सोपं नसतं.

Dharmaveer: 'पश्या बघ काय कमावलंयस तू', 'धर्मवीर'चं कौतुक करताना अभिनेत्याच्या आईच्या डोळ्यात पाणी
संतोष जुवेकरने सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 3:05 PM

बायोपिकमधील मुख्य भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हानात्मक असतं. त्या व्यक्तीच्या प्रतिमेला कुठलाही धक्का न लावता, अभिनयात कुठलाही कृत्रिमपणा न आणता पडद्यावर फक्त ती व्यक्ती साकारणं हे म्हणावं तसं सोपं नसतं. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) या चित्रपटाच्या निमित्ताने ही जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आणि अत्यंत चोखपणे ती पार पाडली. म्हणूनच महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून त्याच्या या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळतोय. अनेकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच एक मोलाची प्रतिक्रिया प्रसादला मिळाली आहे. अभिनेता संतोष जुवेकरने (Santosh Juvekar) हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत संतोषची आई ‘धर्मवीर’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं तोंडभरून कौतुक करताना दिसतेय. इतकंच नव्हे तर हे कौतुक करताना या व्हिडीओअखेर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात.

‘पश्या बघ काय कमावलंयस तू. माझी आई आज तिच्या आनंद दिघे साहेबांना बघून आली,’ असं कॅप्शन देत संतोषने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. संतोषच्या आईने ‘धर्मवीर’च्या कटआऊटचा फोटो क्लिक केला आणि त्या फोटोकडे पाहत त्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. “प्रसादने खूप सुंदर काम केलंय. असं वाटलं प्रत्यक्षात आनंद दिघेच आलेत की काय. चित्रपट पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. वादळवाटपासून मी प्रसादचं काम पाहतेय. पण या चित्रपटात त्याने खूपच छान काम केलंय. प्रसादला मला भेटून त्याला कडकडून मिठी मारायची आहे. त्याने या चित्रपटातून खूप नाव कमावलंय”, असं त्या म्हणतायत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये ‘धर्मवीर’चे 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहोचले. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.