Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते.

Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?
Sharad Ponkshe
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 3:48 PM

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) पुन्हा एकदा त्यांच्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. शरद पोंक्षे यांनी ब्राह्मण संघाच्या आनंद दवे (Anand Dave) यांच्यावर काही आरोप केले होते. आनंद दवे यांनी आपली आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला होता. एका कार्यक्रमासाठी बोलावून हॅाटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन, त्यासाठीचे बील न भरल्याने आपल्याला त्रास झाल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले होते.

शरद पोंक्षे यांची ही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाल्यानंतर डिलीट करण्यात आली आहे. मात्र, आता या पोस्ट वरून चर्चा रंगल्या आहेत.

काय होती पोस्ट?

‘माझ्या मी व नथुराम ह्या पुस्तकाच्या 8 व्या आवृत्तीचं लोकार्पण पुण्यातील श्री आनंद दवे ह्यांनी त्यांच्या ब्राह्मण महासंघातर्फे करायचं ठरवलं. त्यासाठी आम्ही मी व प्रकाशक पार्थ बावस्कर पुण्यात पोहोचलो. हॉटेलवर कृष्णा रेसिडेंसीवर दोन खोल्या दवेंनी बूक केल्या. कार्यक्रम संपवून आम्ही घरी परतलो. या घटनेला महिना होऊन गेला तरी आजतागयात दवेंनी कृष्णा हॉटेलचे पैसे भरलेले नाहीत, व ते फोनही ऊचलत नाहीत.’

‘ब्राह्मण संघातर्फे कार्यक्रम केला म्हणून मी हो म्हटले पण हा माणूस मला नेहमीच डँबीस आहे असा संशय होताच त्याने ते सिध्द केले. अखेर प्रकाशकांनी ते पैसे भरले. तेव्हा सर्वांनी दवे बरोबर कोणताही व्यवहार करू नये ही विनंती, सोबत त्याचा फोटो देत आहे. तसेच समस्त ब्राह्मण संघातील सभासदांनी सावध रहावे’, अशी पोस्ट त्यांनी लिहिली होती, जी आता काढून टाकण्यात आली आहे.

ब्राह्मण संघ आणि याचा काही संबंध नाही!

शरद पोंक्षे यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर एका वेबसाईटशी बोलताना आनंद दवे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. याविषयी बोलताना आनंद दवे म्हणाले की, ‘या रूम बुकिंगचा आणि ब्राह्मण सेवा संघाचा काहीही सबंध नाही. शरद पोंक्षेंचे दोन कार्यक्रम ब्राह्मण संघाने घेतले होते. या कार्यक्रमासाठी आवश्यक असलेला हॉल, साहित्य आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी ब्राह्मण संघाची होती आणि त्यांनी ती पूर्ण देखील केली.’

आता शरद पोंक्षे यांनी देखील त्यांची पोस्ट आपल्या वॉलवरून हटवली आहे. त्यामुळे हा वाद आता मिटला असावा, किंवा यावर तोडगा निघाला असावा असे म्हटले जात आहे.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.