Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी पुन्हा लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् विवाहस्थळ झालं निश्चित

"गेल्या वर्षी 7 मे रोजी सोनालीने दुबईत कुणालशी लग्न केलं. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे ती मित्रपरिवार, कुटुंबीय, नातेवाईक यांना कोणालाच ती बोलावू शकली नव्हती. सोनाली आणि कुणालचे आईवडील हे व्हर्चुअली (व्हिडीओ कॉलद्वारे) या लग्नाचे साक्षीदार झाले होते."

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी पुन्हा लग्नबंधनात अडकणार; तारीख अन् विवाहस्थळ झालं निश्चित
Sonalee Kulkarni and Kunal BenodekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 2:43 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) लॉकडाउनदरम्यान 7 मे, 2021 रोजी कुणाल बेनोडेकरशी (Kunal Benodekar) लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी (wedding anniversary) हे दोघं पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे सोनालीने दुबईतील एका मंदिरात लग्न केलं होतं. सर्व परिस्थिती पहिल्यासारखी होताच कुटुंबीय आणि पाहुण्यांच्या उपस्थित पुन्हा एकदा लग्न करणार असल्याचं तिने त्यावेळी सांगितलं होतं. आता या लग्नाची तारीख आणि स्थळ या दोन्ही गोष्टी ठरल्या आहेत. ‘ई टाइम्स’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सोनालीच्या एका खास मैत्रिणीने या लग्नाविषयीची माहिती दिली आहे.

“गेल्या वर्षी 7 मे रोजी सोनालीने दुबईत कुणालशी लग्न केलं. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे ती मित्रपरिवार, कुटुंबीय, नातेवाईक यांना कोणालाच ती बोलावू शकली नव्हती. सोनाली आणि कुणालचे आईवडील हे व्हर्चुअली (व्हिडीओ कॉलद्वारे) या लग्नाचे साक्षीदार झाले होते. आयुष्याच्या इतक्या महत्त्वाच्या दिवशी ते तिथे उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सोनाली आणि कुणाल आता पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशीच त्यांचं हे दुसरं लग्न होणार आहे. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक, इंडस्ट्रीत मोजके पाहुणे उपस्थित राहतील”, अशी माहिती तिच्या मैत्रिणीने दिली.

पहा फोटो-

महाराष्ट्रीयन विवाहपद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडणार आहे. येत्या 7 मे रोजी लंडनमध्ये सोनाली आणि कुणाल पुन्हा एकदा विवाहबद्ध होतील. सोनाली सध्या मुंबईतच असून लंडनसाठी ती लवकरच रवाना होणार आहे. सोनालीचा पती कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईला राहतो. कुणालचे कुटुंबीय लंडनला वास्तव्यास असतात. त्याचं शिक्षणसुद्धा लंडनमध्येच पूर्ण झालं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.